जिल्ह्यातील खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी जाहीर
जिल्ह्यातील खरीप
हंगामाची नजर अंदाज पैसेवारी जाहीर
बुलडाणा, (जिमाका) दि. 1: सन 2024-25 या खरीप हंगामातील
जिल्ह्यातील एकूण 1420 गावांची अंतिम पीक पैसेवारी जाहीर झाली आहे. जाहिर झालेल्या पिक पैसेवारीनुसार जिल्ह्यातील
1420 गावापैकी 1347 गावांची नजर अंदाज पिक पैसेवारी 50 पैसेचेवर तर 73 गावांची नजर
अंदाज पिक पैसेवारी 50 पैशांच्या आत जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी
कार्यालयाने याबाबत तालुकानिहाय गावे व नजर अंदाज पीक पैसेवारी जाहीर केली आहे.
तालुकानिहाय अंतिम पीक पैसेवारी
50 पैसेपेक्षा जास्त
पैसेवारी याप्रमाणे : बुलडाणातील 98 गावांची अंतिम पीक पैसेवारी 72, चिखली तालुकात 144 गावांची
पैसेवारी 70, देऊळगाव राजा 64 गावांची पैसेवारी 72, मेहकर 161 गावांची पैसेवारी
72, लोणार 91 गावांची पैसेवारी 62, सिं. राजा 114 गावांची पैसेवारी 68, मलकापूर 73
गावांची पैसेवारी 67, मोताळा 120 गावांची पैसेवारी 61, नांदुरा 112 गावांची
पैसेवारी 65, खामगांव 146 गावांची पैसेवारी 53, जळगांव जामोद 119 गावांची पैसेवारी
55 पैसे आणि संग्रामपूर 105 गावांची अंतिम पीक पैसेवारी 73 आहे. तर 50 पैसेपेक्षा
कमी शेगांवमधील 73 गावांची 47 पैसेवारी जाहिर झाली आहे. असे जिल्ह्याची एकूण 1420
गावांची अंतिम पीक पैसेवारी 65 पैसे जाहिर झाली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने
प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment