दिव्यांग प्रमाणपत्राचे वितरण तांत्रिक कारणामुळे थांबविले
दिव्यांग
प्रमाणपत्राचे वितरण तांत्रिक कारणामुळे थांबविले
बुलडाणा, (जिमाका) दि.16: जिल्हा रुग्णालय बुलडाणाव्दारे
दिव्यांग बोर्डामार्फत दिव्यांग प्रमाणपत्र वितरण करण्यात येतात. परंतु स्वालंबन संगणक
प्रणालीमध्ये दिव्यांग प्रमाणपत्राचे कामकाज करताना संगणक प्रणाली वेळोवेळी बंद पडत
असल्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्राचे कामकाज करण्यास विलंब होत आहे. याबाबत आयुक्त अपंग
कल्याण, अपंग कल्याण आयुक्तालय पुणे यांचे कार्यालयाशी पत्रव्यंवहार करण्यात आले आहे.
तरी ज्या दिव्यांग व्यक्तीनी तपासणी होऊन प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे दिव्यांग बोर्डामध्ये
जमा केलेले आहे. त्याचे प्रमाणपत्र तयार झाल्यानंतरच प्रमाणपत्र घेणेकरीता दुरध्वनीद्वारे
कळविण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीनी प्रमाणपत्रासाठी फोन आल्याशिवाय
येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बि.एस. भुसारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment