Friday 19 April 2024

DIO BULDANA NEWS 19.04.2024

 निवडणुकीदरम्यान तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार

*आठवड्यात पाच दिवस ड्राय डे जाहिर

बुलडाणा, दि. 19 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. यासाठी दि. 24 ते 26 एप्रिल आणि त्याआधी दि. 21 एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती आणि दि. 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने ड्राय डे जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार आठवड्यातील पाच दिवस जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञाप्ती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

तसेच सोमवार, दि. १३ मे २०२४ रोजी रावेर मतदारसंघासाठी मलकापूर आणि नांदुरा तालुक्यात मतदान होणार आहे. त्यासाठी दि. 11 ते 13 मे दरम्यान ड्राय डे जाहिर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, दि. ४ जून २०२४ रोजी होणार आहे. या दिवशी मद्यविक्री बंद राहणार आहे.

निवडणुका खुल्या, मुक्त, निर्भय, शांततेच्या वातावरणात, पार पाडण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती नमुना सीएल-२, सीएल-३, एफएल-१, एफएल-२, एफएल-३, एफएल, बीआर-२ आदी बंद ठेवणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१च्या कलम १३५ (सी), तसेच मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ चे कलम १४२ (१) नुसार तसेच त्या अंतर्गत केलेल्या विविध नियमानुसार मतदानासाठी तीन दिवस आणि मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येतील.

दि. 24 एप्रिल रोजी मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदर सायंकाळी 5 वाजल्यापासून संपूर्ण लोकसभा मतदारसंघ आणि मलकापूर, नांदुरा तालुक्यालगत पाच किलोमीटर परिसरातील सदर तालुक्यातील भाग येथे मद्य विक्री बंद राहिल. दि. 25 एप्रिल रोजी मतदानाच्या पूर्वीचा संपूर्ण दिवस आणि दि. 26 एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहिल. तसेच मतमोजणीच्या दिवशी दि. 4 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात मद्यविक्री बंद राहिल.   

बुलडाणा जिल्ह्यालगत रावेर, जालना, औरंगाबाद, मध्यप्रदेशातील बुऱ्हानपूर मतदारसंघासाठी दि. 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे दि. 11 मे रोजी रावेर मतदारसंघात समाविष्ट मलकापूर आणि नांदुरा येथे सायंकाळी पाच वाजल्यापासून मद्यविक्री बंद राहिल. तसेच मतदानपूर्वीचा दिवस आणि मतदानाचा दिवस दि. 12 आणि दि. 13 मे रोजी जिल्ह्यातील रावेर मतदारसंघालगत 5 किलोमीटर परिसरात जिल्ह्यातील भागात मद्यविक्री बंद राहणार आहे.

सदर आदेशाची जिल्ह्यातील सर्व संबंधित अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करीत नसल्यास किंवा आदेशाचे उल्लंघन करीत असल्यास त्यांच्याविरुद्ध मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ५४ (१) (सी) नुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

000000





जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मतदार प्रतिज्ञा

मतदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करा

-बी. एम. मोहन

बुलडाणा, दि. 19 : लोकशाही केंद्रीत राजकीय व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी निष्पक्ष, भयमुक्त व शांततापूर्ण वातावरणात निवडणूक प्रक्रियेसाठी नैतिक मुल्याधारित मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध विभागांतर्गतच्या मतदार जागरूकता मंचाच्या वतीने गुरूवारी (दि. १८) रोजी सामुदायिक मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल बी. एम. मोहन यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सामुदायिक मतदार प्रतिज्ञा कार्यक्रम पार पडला. यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचारी संवर्गाच्या संघटनांचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांना सशक्त मतदार म्हणून घडविण्यासाठी सहाय्यकारी ठरण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय विभाग व अधिनस्थ कार्यालयामधून ९६५ मतदार जागरूकता मंच स्थापना करण्यात आले आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या 'सुनियोजित मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग' या प्रमुख कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदार जागरूकता मंचाची स्थापन करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांमध्ये शासकीय व निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक साक्षरता व सहकार्यता निर्माण करण्यासाठी हा फोरम महत्वपूर्ण आहे.

व्होटर अवेअरनेस फोरम ही निवडणूक प्रक्रियेच्या आधारावर चर्चा आणि जागरूकता व्यक्त करण्यासाठी साधनांचे व्यवस्थापन, मतदार नोंदणी आणि मतदान कसे, काय आणि कुठे करावे आदी बाबतीत वास्तव मार्गदर्शन व समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणारे महत्वपूर्ण माध्यम ठरू शकते, या विश्वासाने या फोरमचे कार्यान्वयन करण्यात आले आहे.

दरम्यान गुरूवारी जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना दि. २६ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच त्यांच्या माध्यमातून ‘चला जाऊया मतदानाला’चा संदेश देण्यात आला. सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी मतदार जाणीव जागृतीसाठी सक्रियेतेने सहभागी होऊन लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी उत्स्फूर्तपणे कार्य करावे, असे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी केले आहे.

000000

श्री महावीर जयंतीला कत्तलखाने, मांसविक्री बंद

बुलडाणा, दि. 19 : जिल्ह्यात रविवार, दि. 21 एप्रिल रोजी श्री महावीर जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्ताने कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे. निर्बंधाच्या कालावधीत मांसविक्री होणार नाही, याची दक्षता देण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.

 जैन धर्मियांच्या वतीने महावीर जयंती उत्सवानिमित्त रविवारी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच दि. 23 एप्रिल 2024 रोजी हनुमान जयंतीनिमित्त उत्सव मिरवणूक काढण्यात येणार आहे. सध्या विविध राजकीय पक्ष संघटनांकडून सुरु असलेली आंदोलने, मराठा आंदोलनाची पार्श्वभूमी, राज्यातील राजकीय घडामोडी व त्यांच्याकडून विविध मागण्या संदर्भात होणारे आंदोलने आणि जवळच्या काळात घडलेल्या जातीय घटना आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी, तसेच उत्सवाचा मागील इतिहास लक्षात घेता या उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी दक्षता बाळगणे आणि खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणून चोख बंदोबस्त नेमणे आवश्यक असल्याने उत्सवाचे काळात दि. 21 एप्रिल 2024 रोजी श्री महावीर जयंती निमित्ताने कत्तलखाने आणि मांसविक्री दुकाने बंद ठेवणे आवश्यक आहे.

त्यानुसार दि. 21 एप्रिल 2024 रोजी श्री महावीर जयंती उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, यासाठी कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवावीत, तसेच कोणत्याही परिस्थितीत मांसविक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे.

000000

General Parliamentary Election - 2014

Hon’ble Election Observer Appointed at 5 - Buldhana 

Public can contact in morning 9 to 10

Buldhana, Dt 19 :

            Hon’ble Election Commission of India has announced General Parliamentary Election– 2014 on March 16, 2014. The polling in 5 – Buldhana Parliamentary Constituency is scheduled on April 26, 2014 in Second Phase. On this background Mr. P. J. Bhagdev is appointed as the Election Observer (General) for 5 – Buldhana Constituency General Parliamentary Election– 2014.

            Mr. P. J. Bhagdev – Hon’ble Election Observer (General)

            Hon’ble Election Observer (General) Mr. P. J. Bhagdev’s contact no is 7385976149 and his Liaisoning Officer is Mr. Tushar Metkar, Executive Engineer with contact no is 9860823637. Hon’ble Election Observer (General) residence is ‘Savitri’ – Government Rest House, Buldhana.

            Mr. P. J. Bhagdev - Hon’ble Election Observer (General) is arrived in the District and Hon’ble Collector and Returning Officer, Buldhana Dr. Kiran Patil appeals Public, Political Parties, and Candidates that they can contact in person or call on the above-mentioned contact number during 09.00 to 10.00 in the morning; if they have any complaint regarding.

00000

No comments:

Post a Comment