Monday 8 April 2024

DIO BULDANA NEWS 06.04.2024

 निवडणूक निरीक्षकांशी सकाळी साधता येईल संपर्क

बुलडाणा, दि. 6 : बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. या पार्श्वभुमीवर भारत निवडणूक आयोगाकडून बुलढाणा लोकसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीबाबत तक्रार असल्यास निरीक्षकांशी सकाळी 9 ते 10 या वेळेत दूरध्वनीवर संपर्क साधता येणार आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध केला आहे. त्यासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे.  
निवडणूक निरिक्षक सर्वसाधारण म्हणून पी. जे. भागदेव असून त्यांचा संपर्क क्रमांक 7385976149 हा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी तुषार मेतकर 9860823637 हे आहे. निरीक्षक यांचे निवासस्थान सावित्री, शासकीय विश्राम गृह, बुलढाणा येथे आहे. 
निवडणूक निरिक्षक कायदा व सुव्यवस्था म्हणून सेनथील क्रिष्णा असून त्यांचा संपर्क क्रमांक 8421797614 हा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी श्रीधर घुट्टे 9850394342 हे आहे. निरीक्षक यांचे निवासस्थान अजिंठा, शासकीय विश्राम गृह, बुलढाणा येथे आहे. 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत. राजकीय पक्ष, उमेदवार, नागरिकांची तक्रार असल्यास संपर्क क्रमांकावर सकाळी 9 ते 10 या वेळेत संपर्क साधता येईल, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे.
0000

लोकसभा निवडणुकीमुळे शेगाव, खामगाव येथील परिवहनचे शिबीर रद्द
बुलडाणा, दि. 6 : बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे खामगाव आणि शेगाव येथील परिवहन विभागाचे शिबिर रद्द करण्यात आले आहे. सदर शिबिर आता दि. 27 एप्रिल 2024 रोजी खामगाव येथे घेण्यात येणार आहे,
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान असल्यामुळे दि. 25 एप्रिल 2024 रोजी निवडणूक अनुषंगिक कामकाज मोटार वाहन निरीक्षक यांच्याकडे असल्यामुळे दि. 25 एप्रिल 2024 रोजीचे शेगाव आणि दि. 26 एप्रिल 2024 रोजीचे खामगाव येथील शिबीर रद्द करण्यात आले आहे. शेगाव व खामगाव येथे घेण्यात येणाऱ्या शिबीराऐवजी दि. 27 एप्रिल 2024 रोजी खामगाव येथे शिबीर घेण्यात येणार आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी कळविले आहे.
000000

प्रताप पंढरीनाथ पाटील यांच्या उमेदवारी अर्जाबाबत स्पष्टीकरण
बुलडाणा, दि. 6 : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रताप पंढरीनाथ पाटील यांनी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र केंद्रीय निवडणूक आयोग यांचे पत्र क्रमांक 56/2024/पीपीएस-आयआयआय, दि. 27 मार्च 2024 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार बहुजन मुक्ती पार्टी पुरस्कृत उमेदवाराकडून पक्षाचा ए व बी फॉर्म स्वीकारण्यात येऊ नये असे कळविण्यात आले आहे. त्यामुळे ए व बी फॉर्म अस्विकृत होत असल्यास, नामनिर्देशन पत्र अपक्ष उमेदवार म्हणून स्वीकृत करण्याबाबत उमेदवार श्री. पाटील यांनी दि. 3 एप्रिल 2024 च्या पत्रान्वये विनंती अर्ज केला होता. तसेच त्यांनी दहा सूचक नावे देखील प्रस्तावक म्हणून सादर केली होती. त्यानुसार अपक्ष म्हणून त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे, अशी माहिती दिली आहे.
0000

लोकसभा निवडणुकीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन
बुलडाणा, दि. 6 : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. १९५० या हेल्पलाईनसह नियंत्रण कक्षात दूरध्वनी क्रमांक 07262 295002 आणि टोल फ्री क्रमांक 1800 233 0586 कार्यान्वित करण्यात आला आहे.
सदर निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर 24x7 कंट्रोल रुम स्थापन करण्यात आला आहे. कंट्रोल रुमसाठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. तसेच आवश्यक यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद वेळेसह तक्रार नोंदवहीमध्ये करण्यात येते. निवडणूक खर्चाच्या संदर्भातील तक्रारी तात्काळ खर्च निरीक्षकास सूचना देऊन भरारी पथकाकडे पाठविण्यात येतात. आदर्श आचार संहितेशी संबंधित तक्रारी निवडणूक निरीक्षक यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच तक्रारीवर कार्यवाही करण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास भरारी पथकांकडून कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर नियंत्रण कक्ष सुरळीत सुरु ठेवण्यात येणार आहे. 
00000

No comments:

Post a Comment