Thursday 4 April 2024

DIO BULDANA NEWS 04.04.2024

 लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 29 उमेदवारांचे नामांकन

बुलडाणा, दि. 4 : बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 29 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान आज 17 उमेदवारांनी त्यांचे नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे सादर केले. आज नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती.

आज बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी 5 जणांनी 5 अर्जाची उचल केली. दरम्यान आज  17 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. आतापर्यंत 62 जणांनी 137 अर्जाची उचल केली होती. यातील 29 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. आज गजानन जर्नादन धांडे – अपक्ष, नरेंद्र दगडू खेडेकर – शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्ञानेश्वर पुरूषोत्तम पाटील – अपक्ष, सचिंद्र शेषराव मघाडे – सोशालिस्ट पार्टी इंडिया, दिपक भानुदास जाधव पिपल्स पार्टी ऑफ  इंडिया डेमॉक्रॅटीक, शाम बन्सीलाल शर्मा – अपक्ष, अशोक वामन हिवाळे – अपक्ष, नामदेव दगडू राठोड – अपक्ष, वसंत राजाराम मगर – वंचित बहुजन आघाडी, संतोष भिमराव इंगळे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर, दिनकर तुमाकार संबारे – अपक्ष, विकास प्रकाश नांदवे – भिमसेना, बाळासाहेब रामचंद्र इंगळे – बहुजन संघर्ष सेना, गौतम किसनराव मघाडे – बसपा, विलास शंकर तायडे – बहुजन समाज पार्टी, ॲड. सैयद मुबीन सैय्यद नईम – अपक्ष, माधवराव सखाराम बनसोडे बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी या उमेदवारांनी आज नामांकन अर्ज दाखल केले.

याआधी संजय रामभाऊ गायकवाड – शिवसेना, विजयराज शिंदे – भाजप, प्रतापराव जाधव – शिवसेना, रविकांत चंद्रदास तूपकर – अपक्ष, रेखा कैलास पोफळकर – अपक्ष, प्रताप पंढरीनाथ पाटील – बहुजन मुक्ती पक्ष, महंमद हसन इनामदार – मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टी, सूमन मधुकर तिरपुडे – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक, संदीप रामराव शेळके – अपक्ष, नंदू जगन्नाथ लवंगे – अपक्ष, उद्धव ओंकार आटोळे – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दि. 28 मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. आज इच्छुकांनी दि. 4 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन अर्ज सादर केले. दाखल करण्यात आलेल्या सर्व 29 नामनिर्देशन पत्रांची शुक्रवारी, दि. 5 एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे. तसेच दि. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

000000

लोकसभा निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल

*तक्रारी, सूचनांसाठी संपर्क करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 4 : लोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने तिनही निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निरीक्षक म्हणून पी. जे. भागदेव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या संपर्क क्रमांक 9978407950 असून सर्कीट हाऊसमधील जिजाऊ कक्षामध्ये त्यांचे वास्तव्य आहे. निवडणूक कायदा व सुव्यवस्थेसाठी निरीक्षक म्हणून सेंथिल कृषन्न यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9411112792, 9639146066 असून सर्कीट हाऊस मधील अजिंठा कक्षात त्यांचे वास्तव्य आहे. निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून अमित शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 8811007872 असा आहे. त्यांचे वास्तव हे सर्कीट हाऊसमधील सावित्री कक्षात आहे.

निवडणूक विषयक तक्रारी किंवा समस्यांबाबत तिनही निरीक्षकांकडे म्हणणे मांडता येणार आहे. नागरिकांनी त्यांच्या निवडणूक विषयक तक्रारी किंवा सूचना असल्यास निरीक्षकांकडे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000



निवडणूक निरीक्षकांकडून कामकाजाचा आढावा

बुलडाणा, दि. 4 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षकांचे जिल्ह्‌यात आगमन झाले असून कामकाजाला सुरवात झाली आहे. आज तिनही निवडणूक निरीक्षकांनी विविध ठिकाणी भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

सामान्य निरीक्षक पी. जे. भागदेव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकारी यांच्या समवेत आढावा घेतला. त्यांनी निवडणुकीसाठी आवश्यक असणारे साहित्य, वाहतूक व्यवस्था, वाहनांची उपलब्धता यांची माहिती घेतली. निवडणूक कामकाजाशी निगडीत निविदा झाल्या आहेत. त्यांच्यासोबत करारही झाले आहेत. त्यांच्याकडून आवश्यक असलेल्या सुविधा गरजेनुरूप प्राप्त करून घ्याव्यात. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फिरते पथक, स्थिर तपासणी पथक, व्हीडीओग्राफी पथक पुरेसे आहेत. त्यांच्याकडून प्रभावीपणे काम करून घेण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

निवडणूक कायदा व सुव्यवस्थेसाठी नियुक्त निरीक्षक सेंथिल कृष्णण यांनी आज सुरवातीला माध्यम कक्षाला भेट दिली. कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती घेतली. टिव्ही, वृत्तपत्र आणि समाजमाध्यमांवरील निवडणूक विषयक प्रसिद्धीवर बारकाने लक्ष्य ठेवावे. प्रामुख्याने पोर्टलवरील बातम्या या वेगाने वितरीत होत असल्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या. त्यानंतर नियंत्रण कक्षातील सी-व्हीजील ॲपवरील तक्रारीबाबत माहिती घेतली. तसेच पथकांचे लोकेशन बाबत माहिती घेतली. त्यानंतर निवडणूक कक्षाला माहिती घेऊन 1950 या हेल्पलाईनची माहिती घेतली. निवडणूक खर्च निरीक्षक यांनी विविध यंत्रणांशी संपर्क साधून खर्चविषयक आढावा घेतला.

000000






मतदार जागृती रॅलीने दुमदुमला जिल्हा

मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करा – जिल्हाधिकारी

बुलडाणा, दि. 4 : वैश्विक ओळख असलेल्या भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात निवडणूक प्रक्रिया व मतदानाच्या अधिकाराचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत २६ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतांचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात निघालेल्या मतदार जागृती रॅलीने जिल्हा दुमदुमला आहे.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे युवक, नवमतदार, महिला, दिव्यांग, जेष्ठ नागरिक आणि सर्वसाधारण मतदार यांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुनियोजित मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक कुटुंबापर्यंत मतदानाचा संदेश पोहचविण्यासाठी व मतदार जाणीव जागृतीच्या उद्देशाने जिल्हाभरात सर्वदूर शालेय विद्यार्थी, शिक्षक व नागरिक यांच्या सहभागाने मतदार जागृती रॅलींचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याचा मतांचा टक्का वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील सुमारे १८ हजार नवमतदार, सोळा हजार दिव्यांग मतदार, 30 हजार ज्येष्ठ मतदार इत्यादीसह संपूर्ण मतदारांना दृष्टीक्षेपात ठेऊन मतदार जाणीव जागृतीसाठी व्यापक प्रयत्न केल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी बी. एम. मोहन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील १३ तालुक्यात सुनियोजित मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग कार्यक्रमासाठी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना तालुका नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.   प्रत्येक मताचे मुल्य लोकशाही महत्त्वपूर्ण असून प्रत्येक सुजाण नागरिकाने आपला मताधिकार बजावून हा लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

मतदार जनजागृती रॅलीसोबतच इतर वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन प्रशासनातर्फे केले जात आहे.

00000

No comments:

Post a Comment