Thursday 18 April 2024

DIO BULDANA NEWS 17.04.2024

 


युवकांमध्ये जाणीव जागृतीसाठी मॉडेल डिग्री कॉलेजचा पुढाकार

लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांचा सहभाग महत्वपूर्ण

– अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन

बुलडाणादि. 17 : युवक हा प्राधान्य मानून समाजातील सर्व घटकांमध्ये मतदार जाणीव जागृती करण्यासाठी मॉडेल डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांनी पुढकार घेतला आहे. जिल्ह्यातील वरीष्ठ महाविद्यालयांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यातून मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थी दशेपासूनच युवकांना देशातील  निवडणक प्रक्रियात्या अनुषंगीक अधिकारांची माहिती करुन देणे, तसेच मतदार नोंदणी आणि विविध स्तरावरील निवडणक कार्यक्रमत्यामधील सहभाग याबद्दल ज्ञान वृद्धींगत करण्याच्‍या उद्देशाने यापूर्वीच वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये निवडणक साक्षरता मंडळ  व लोकशाही दालनाची स्थापना करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर समाजातील सर्व घटकांमध्ये मतदानाविषयी व्यापक जाणीवजागृतीचा संदेश देण्यासाठी आयोजित करावयाच्या विविध उपक्रमांविषयी मॉडेल डिग्री कॉलेजच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी बी. एम. मोहन यांची भेट घेतली.  त्यामध्ये मानद संचालक डॉ. अण्णासाहेब म्हळसणेप्रा. अर्चना गावंडे पाटीलप्रा. मनोज डांगेप्रा. मनिषा राऊतप्रा. डॉ. प्रेरणा पाटीलप्रा. डॉ. रिंढेप्रा. भिसे आदींचा समावेश होता.

सशक्त लोकशाही व्यवस्थेसाठी निवडणक प्रक्रियामतदार नोंदणी आणि जाणीव जागृतीसाठी केंद्रीय निवडणक आयोगातर्फे विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. भारतीय निवडणक प्रक्रियेविषयी नागरीकांमध्ये जागरुकता निर्माण करुन लोकप्रतिनिधी आणि मतदारांचा निवडणक प्रक्रियेतील सहभाग वृद्धींगत करणे हा या मागील मुख्य हेत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये निवडणक साक्षरता मंडळ व लोकशाही दालनाची स्थापना व कार्यान्वयन करण्यात आले आहे.

निवडणक प्रक्रिया व मतदार जाणीव जागृतीसाठी विविध कल्पक उपक्रमांचे आयोजन करण्याच्या उद्देशाने मॉडेल डिग्री कॉलेजचे 42 प्राध्यापक जिल्ह्यातील महाविद्यालयांना भेटी देणार आहे. जिल्ह्यातील नवमतदार व  सर्वसाधारण मतदारांनी भारतीय लोकशाही व्यवस्थेचा गौरव वाढविण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी जाणीव जागृती करणार आहेत.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणूकीत समाजातील सर्व घटकांनी पुढे येऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा व मॉडेल डिग्री कॉलेजच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment