Sunday 31 March 2024

DIO BULDANA NEWS 31.03.2024





नवमतदार नोंदणी, जागृतीसाठी निवडणूक साक्षरता मंडळ

लोकशाहीच्या उत्सवात युवकांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 31 : विद्यार्थीदशेपासूनच युवकांना देशातील  निवडणूक प्रक्रिया, मतदानाचा अधिकाराची माहिती करुन देणे, तसेच मतदार नोंदणी आणि विविधस्तरावरील निवडणूक कार्यक्रमाबद्दल ज्ञान वृद्धींगत करण्यासाठी जिल्ह्यातील ३५३ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्यात आले आहेत.

सशक्त लोकशाही व्यवस्थेसाठी निवडणूक प्रक्रिया, मतदार नोंदणी आणि जाणीव जागृती यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. भारतीय निवडणूक प्रक्रियेविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करुन लोकप्रतिनिधी आणि मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वृद्धींगत करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सदर मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

या मंडळामध्ये नववी ते पदवी शिक्षणासाठी प्रवेशित सर्व विद्यार्थी सदस्य म्हणून सहभागी राहणार आहे. प्रामुख्याने १८ ते २१ वयोगटातील विद्यार्थी विशेष लक्ष्य असणार आहे. सदर मंडळाला शाळा किंवा शैक्षणिक संस्थेचे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षरता मंच स्थापीत करण्यात येत आहेत. तसेच त्यासाठी शाळेतील अथवा महाविद्यालयातील निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष काम केलेल्या जाणकार शिक्षकाची प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. शिक्षकांची निवड करताना राज्यशास्त्राचे अथवा विविध निवडणुकांमध्ये कर्तव्य बजावण्याचा अनुभव असणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यांना निवडणूक साक्षरता मंचाचे निमंत्रक असे संबोधन्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ६०२ शिक्षक निमंत्रक आणि सहनिमंत्रक म्हणून निश्चित करण्यात आले आहेत.

संबंधित शाळा-महाविद्यालयातील वय वर्षे १५ ते २१ या वयोगटातील सर्व विद्यार्थी या मंडळाचे सदस्य असणार आहेत. निवडणूक साक्षरता मंडळातर्फे आयोजित उपक्रमांच्या संनियंत्रणासाठी सर्व सदस्य विद्यार्थ्यांमधून एक कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे. यात विद्यार्थ्यांची नवमतदार नोंदणी झाली असलेल्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. सदर निवडणूक साक्षरता मंडळाचा कालावधी किमान एक वर्ष अथवा दोन वर्षांपर्यंतचा असणार आहे. या कार्यकारी समितीच्या माध्यमातून सर्व इयत्ताच्या वर्गांमधून निवडणूक प्रक्रिया व मतदार जाणीव जागृतीसाठी विविध कल्पक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील नवमतदार आणि संभाव्य युवा मतदारांनी भारतीय लोकशाही व्यवस्थेचा गौरव वाढविण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी केले आहे.

00000





No comments:

Post a Comment