Monday 4 March 2024

DIO BULDANA NEWS 04.03.2024

 जात वैधता प्रमाणपत्रासाठी 11 मार्चपर्यंत विशेष मोहिम

बुलडाणा, दि. 4 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियानातंर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिम शिबिर उपक्रम राबविण्यात येत आहे. ही मोहीम 11 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

जिल्ह्यात आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक अभियांनातर्गत जात प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रकरणांमधील त्रृटी पुर्ततेसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत अर्जदारांचे शैक्षणिक, सेवा, निवडणूकीसाठी जात वैधता प्रस्ताव पडताळणीसाठी घेतले जाणार आहे. सादर केलेल्या सर्व जाती दावा प्रकरणांमध्ये समितीस्तरावर प्राथमिक छाननी करुन ज्या प्रकरणामध्ये कागदपत्रे, पुरावे अभावी त्रृटी आहे. अशा प्रकरणांमध्ये जाती दावा प्रस्तावात नमूद मोबाईलवर एसएमएसद्वारे, ई- मेल, लेखी पत्रान्वये त्रृटी कळविण्यात आली आहे. यात अर्जदारांनी त्रृटी पुर्तता केली नसल्यास अशा शैक्षणिक, सेवा, निवडणूक प्रस्तावातील अर्जदारांनी दि. 11 मार्चपर्यंत विशेष त्रुटी पूर्तता मोहिमेचा लाभ घ्यावा, त्रृटी पुर्तता करुन प्रकरण निकाली काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

000000

वृद्ध साहित्यिक, कलावंतांनी माहिती सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 4 : वृद्ध साहित्यिक, कलावंतांना मानधन योजनेंतर्गंत मानधन देण्यात येते. यासाठी लाभार्थ्यांच्या संपूर्ण माहितीचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असलेली माहिती पंचायत समिती कार्यालयात सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक, कलावंतांना मानधन योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांची परिपूर्ण माहिती यात आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक, अद्ययावत करणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक आणि कलावंत मानधन योजनेंतर्गंत मानधन घेत असलेल्या कलावंतांनी आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर, ह्यातीचे दाखले यांची छायांकित प्रत गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना दि. 5 मार्च 2024 पर्यंत दुपारी 1 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment