Thursday 21 March 2024

DIO BULDANA NEWS 21.03.202

संग्रामपूर येथे वसतीगृह इमारत

भाड्याने देण्यासाठी संपर्क साधावा

बुलडाणा, दि. 21 : संग्रामपूर येथे आदिवासी मुलींच्या वसतीगृहासाठी इमारत भाडेतत्वावर घ्यावयाची आहे. इमारत मालकांनी वसतीगृह कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गृहपाल, आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, संग्रामपूर करीता भाड्याने इमारत घ्यावयाची आहे. मुलींना राहाण्यायोग्य सुरक्षित, पिण्याचे तसेच वापराच्या पाण्याची मुबलकता, विजेची सुविधांयुक्त मोठी इमारत संग्रामपूर परिसरात उपलब्ध असल्यास, तसेच शासकीय वसतीगृहाकरीता भाड्याने देण्यास इच्छुक असल्यास इमारत मालकांनी गृहपाल, आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, संग्रामपूर, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, ता. संग्रामपूर या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

न्यायाधिकरणात सीमीवरील बंदीबाबत

आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 21 : स्टुडंटस् इस्लामीक मुव्हमेंट ऑफ इंडिया या संघटनेवरील बंदीबाबत आक्षेप असल्यास संबंधितांनी नवी दिल्ली येथील न्यायाधिकरण समक्ष दि. ९ एप्रिल २०२४ रोजी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी केले आहे.

रजिस्टार निबंधक, बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक न्यायाधिकरण, खोली क्र. १६, उच्च न्यायालय, शेर शहा रोड, नवी दिल्ली यांच्या न्यायालयात सुचना क्रमांक एसओ ३५४ (ई) दि. २९ जानेवारी २०२४ अन्वये बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध अधिनियम १९६७ कलम (३) (१) द्वारे स्टुडंटस् इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया या संघटनेस बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करुन बंदी घालण्यात आली आहे.

त्यानुसार गृह मंत्रालय, भारत सरकारने स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया या संघटनेस बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध अधिनियम १९६७ कलम (३) (१) बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करुन ५ वर्षांकरीता बंदी घातली आहे. त्याबाबत काही आक्षेप असल्यास किंवा म्हणणे मांडण्याकरीता रजिस्टार निबंधक, बेकादेशीर हालचाली प्रतिबंध न्याधिकरण, खोली क्र. १६, उच्च न्यायालय, शेर शहा रोड, नवी दिल्ली येथे दि. ९ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजता हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment