Thursday 7 March 2024

DIO BULDANA NEWS 07.03.2024

 सैनिक कल्याणच्या पदभरतीमध्ये अर्ज करण्यास मुदतवाढ

बुलडाणा, दि. 7 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सरळसेवेतील पदभरतीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

सैनिक कल्याण विभागाच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क ची पदे भरण्यासाठ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दि. 3 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा कालावधी देण्यात आला होता. परंतू लोकहितार्थ ऑनलाईन अर्ज मागविण्याचा कालावधी दि. 4 ते 24 मार्च 2024 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे. याचा माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

00000

पीएम विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 7 : ग्रामीण आणि नागरी व्यवस्थेतील कारागीरांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी पीएम विश्वकर्मा कौशल्य विकास योजना राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील दिव्यांगांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेत 18 अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणादरम्यान 500 रूपये प्रती दिवसाप्रमाणे मानधन देण्यात येते. तसेच 15 हजार रूपयांचे व्हाऊचर साहित्य खरेदीसाठी देण्यात येते. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यानंतर ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेकडे या अर्जाची छानणी होते. त्यानंतर जिल्हास्तरावरील पोर्टलवरून राज्यस्तरावर मंजुरी देण्यात येते. अर्ज स्विकृत होऊन प्रशिक्षण घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीस 1 लाख रूपयांचे कर्ज 5 टक्के व्याजदराने उपलबध करून देण्यात येते. या कर्जाची परतफेड केल्यानंतर 2 लाख रूपयांचे कर्ज दिले जाते.

सदर कारागीरांना विश्वकर्मा म्हणून मान्यता देणे, त्यांचे कौशल्य वाढविणे, व्यवसायासंबंधी योग्य प्रशिक्षण देणे, चांगल्या आणि आधुनिक साधनांसाठी सहाय्य प्रदान करणे, विनातारण, सवलतीच्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे, डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देणे, ब्रँड प्रमोशन आणि मार्केट लिंकेजसाठी एक व्यासपीठ प्रदान करणे, ही या योजनेची उद्दीष्टे आहेत.

या योजनेमधून नोंदणीकृत कारागीरांना पारंपारिक कारागीर म्हणून शासनाची मान्यता प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे विश्वकर्मा म्हणून मान्यता, कौशल्य पडताळणी नंतर ५-७ दिवस मूलभूत प्रशिक्षण,  इच्छुक उमेदवार १५ दिवस प्रगत प्रशिक्षण, प्रशिक्षण विद्यावेतन दररोज ५०० रुपये, टूलकिटसाठी प्रोत्साहन म्हणून १५ हजार रुपयांचे व्हाऊचर, वित्तसहाय्य, तारणमुक्त व्यवसायिकता विकासकर्ज ३ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच सवलतीचा व्याजदर एमएसएमईद्वारे ८ टक्के व्याज सवलत मयदिसह लाभार्थीकडून ५ टक्के शुल्क आकारले जाणार आहे, हे लाभ मिळणार आहे.  

सदर योजनेचा लाभ प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेंतर्गत नोंदणीसाठी पात्र असणार आहे. यात लाकूड आधारीत सुतार, बोट निर्माता, औजारे तयार करणारा लोह, धातू आधारीत, दगड आधारीत ब्रॉस, पितळ, तांबे, डायस, भांडी मुर्ती आदी निर्मितीचा समावेश आहे. तसेच लोहार, हॅमर आणि टुलकिट मेकर, कुलुपे बनविणारा मुर्तीकार, स्टोन ब्रोकर, सोने चांदी आधारीत सोनार, मातीवर आधारीत कुंभार, लेदर आधारीत मोची , शु स्मिथ पादत्राणे कारागीर, स्थापत्य गवंडी, गवंडीकाम, इतर बास्केट, मॅट, झाडू निर्माता, काचांचा व्यवसाय करणे, बाहुली आणि खेळणी निर्माता, न्हावी, माला निर्माता माळी, परीट, शिंपी, मासेमारी जाळी बनविणारा या 18 अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या योजनेच्या लाभासाठी नोंदणीच्या तारखेस लाभाथ्यांचे वय १८ वर्ष पूर्ण असावे, लाभार्थी नोंदणीच्या तारखेस संबंधित व्यवसायात गुंतलेला असावा आणि स्वयंरोजगार, व्यवसाय विकासासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या तत्सम पत-आधारित योजना यात पीएमईजीपी, सीएमईजीपी, पीएम स्वनिधी, मुद्रा योजनेंतर्गत मागील ५ वर्षात कर्ज घेतलेले नसावे. या योजनेंतर्गत नोंदणी आणि लाभ कुटुंबातील एका सदस्यापुरते मर्यादित राहणार आहे. सरकारी सेवेत असलेली व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेसाठी पात्र ठरणार नाही,

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी pmvishwakarma.gov.in या संकेतस्थळावर कारागीरांनी आपले सरकार सेवा केंद्रात किंवा खासगी सेवा केंद्रांत जाऊन अर्ज नोंदणी करावी. अर्ज नोंदणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिल्यानंतर शासनाकडून कारागीर ओळखपत्र देण्यात येईल. त्यानंतर कारागीराला या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. यासाठी लाभार्थ्यांना प्रदान नोंदणीसाठी आधारकार्ड, आधार लिंक असेला मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील, शिधापत्रिका, अतिरिक्त दस्तऐवज किंवा माहिती लाभार्थ्यांना एमएसएमई विभागाने विहित केलेल्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त कागदपत्रे किंवा माहिती प्रदान करणे आवश्यक आहे.

सद्यस्थितीत पीएम विश्वकर्मा योजनेच्या ऑनलाईन पोर्टलवर ग्रामीण आणि शहरी असे एकुण जिल्ह्यात ८ हजार ९०४ प्रस्ताव प्राप्त झाले आहे. यातील जिल्हाधिकारी यांनी ६ हजार ४५३ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. तसेच योजनेमध्ये १८ पारंपारिक कारागीरांमधील दिव्यांग आणि पारंपारिक कारागीरांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेंतर्गत नोंदणीसाठी कारागीरांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा खासगी सेवा केंद्राशी संपर्क साधावा, अधिक माहितीसाठी पंचायत समिती व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, अरुणोदय बिल्डिंग, सुवर्णनगर, शिवाजी हायस्कूलजवळ, बुलडाणा यांच्याशी ०७२६२-२२४२८६७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

000000

अल्पसंख्याक शाळांमधील पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अर्ज आमंत्रित

*अर्ज करण्यास 12 मार्चपर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, दि. 7 : राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ पात्र शाळांना घेता यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज, परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी दि. 12 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल खासगी शासनमान्यताप्राप्त इच्छुक शाळा, कनिष्ठ माहविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अपंग शाळा आणि नगर परिषद शाळांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन परिपूर्ण अर्ज, प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment