DIO BULDANA NEWS 20.03.2024

 




जलजागृती सप्ताहात महिला मेळावा, रांगोळी स्पर्धा

बुलडाणा, दि. 20 : जलजागृती सप्ताहानिमित्त जलसंपदा विभागामार्फत  महिला मेळावा आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

जलसंपदा विभागातर्फे १६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. सप्ताहानिमित्ताने दि. १९ मार्च २०२४ रोजी महिला मेळावा आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. रांगोळी स्पर्धा आणि महिला मेळाव्यात महिलांमध्ये ‘पाणी वाचवा’ याबाबत प्रबोधन करण्यात आले.

पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता क्षितीजा गायकवाड अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मृद व जलसंधारण विभागाच्या प्राची गालफाडे उपस्थित होत्या. रांगोळी स्पर्धेत प्रथम निता साळवे, द्वितीय वनिता जाधव आणि तृतीय क्रमांक आश्विनी दांडगे यांनी पटकाविला. सुरेखा जाधव आणि श्रीमती तोमर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती अहेर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी श्रीमती घोडे, श्रीमती झावरे, श्रीमती दिक्षीत, श्रीमती दांडगे, श्रीमती वाघ, श्रीमती इंगळे, श्रीमती खोडे यांनी सहकार्य केले.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या