DIO BULDANA NEWS 31.01.2024
.jpg)
लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणांनी पूर्वतयारी करावी -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील *मतमोजणी ठिकाणाची पाहणी बुलडाणा, दि. 31 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडणुकीशी संबंधीत यंत्रणांनी पूर्वतयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले. निवडणुकीच्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बुलडाणा उपविभागीय अधिकारी पुलकीत सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, येत्या काही दिवसात निवडणुकीच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. आचारसंहिता लागू झाल्याबरोबर विविध समित्या आणि कार्यवाही करणाऱ्या यंत्रणांना देण्यात आलेल्या कामांची पूर्वतयारी करून ठेवावी. प्रामुख्याने शासकीय संकेतस्थळ, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जाहिराती हटविण्यात याव्यात. आचारसंहिता लागू झाल्याबरोबर खर्च विषयक निरीक्षक जिल्ह्यात येतात. त्यांच्या दृष्टीने आवश्यक असलेली माहिती पुरविण्यात यावी. निवडणूक व्यवस्थितरित...