Monday 11 September 2023

DIO BULDANA NEWS 11.09.2023

 अन्न प्रक्रिया उद्योगासाठी तीन कोटींपर्यंत अनुदान

*शेतकरी उत्पादक कंपन्यांसह गटांना प्राधान्य

बुलडाणा, दि. 11 : शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व अन्न प्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. तसेच भरपूर पोषण मूल्य असणाऱ्या प्रक्रिया उत्पादनांचीही मागणी आहे. यासाठी स्थानिक, स्वदेशी, गावरान, सेंद्रिय पारंपारिक उत्पादनांना वाव देण्यासाठी केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना कृषी विभागातर्फे राबविली जात आहे. यात कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रकल्पाच्या ३५ टक्के, तसेच कमाल तीन कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

नव्याने स्थापित होणाऱ्या किंवा सद्यस्थितीत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण, स्तर वृद्धीसाठी या योजनेतून संबंधित जिल्ह्याच्या ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ यावर आधारीत कृषी प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य दिले जात आहे. या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक, सामाईक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटिंग व ब्रॅण्डींग इत्यादी घटकांकरिता अर्थसहाय्य देण्यात येते. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा कमाल १० लाख तर सामाईक पायाभूत सुविधा, इन्क्युबेशन केंद्र, मुल्यसाखळी या घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा कमाल ३ कोटी रूपयांचे अर्थ सहाय्य देण्‍यात येणार आहे.

यासाठी उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, भागीदारी संस्था, तसेच गट लाभार्थीमध्ये शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी, शासकीय संस्था यांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी किंवा त्यांचे विस्तारीकरण, स्तरवृद्धी आणि आधुनिकीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करणे, बँकेकडे सादर करणे, याबाबतच्या नोंदणीसाठी कृषी विभागाकडून जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत हाताळणी सहाय्य केले जात आहे. आत्मातील नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि वैयक्तिक शेतकरी यांनी प्रकल्प करतेवेळी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेसोबत कृषी पायाभूत योजनेची सांगड घातल्यास अनुदानासोबत तीन टक्के व्याजात सवलत मिळणार आहे.

00000

कृषि विभागातर्फे विद्यार्थी पोषण जागरुकता मोहीम

बुलडाणा, दि. 11 : कृषि विभागातर्फे सन 2023-24 मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यात येत आहे. जिल्ह्यात पौष्टिक तृणधान्याच्या उत्पादनात वाढ करणे व लोकांमध्ये पौष्टिक तृणधान्य मधील गुणधर्माविषयी जागरूकता निर्माण करून दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यात राळा या पिकाची मिलेट ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता मोहिम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आहारातील पौष्टिक तृणधान्यांच्या पदार्थांचा वापर वाढविण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने परिपत्रक निर्गमित केले आहे. दि. 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच शाळांतील मुलांमध्ये तृणधान्याचे महत्व पटवून देण्यासाठी पाककला स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे.

राळा पिकास फॉक्सटेल मिलेट, जर्मन मिलेट असेही संबोधले जाते. या पिकाचे कणीस झुपकेदार असून पक्वतेच्या वेळी कोल्ह्याच्या शेपटी सारखे अर्धगोलाकार होते. म्हणून याला फॉक्सटेल म्हणजेच कोल्ह्याची शेपटी मिलेट असे म्हणतात. हिंदीमध्ये कागनी, गुजरातमध्ये कांग, तर पंजाबमध्ये कंगनी म्हणतात.

राळा हे एकदल प्रकारातील पीक असून जातीनुसार 60-100 सेंमीपर्यत उंच वाढणारे, खोडकाडीसारखे सरळ वाढते. फुटव्याची संख्या ३-५ पर्यंत असते, पाने गवताळ असून मऊ किंवा त्यावर लव असते. कणीस 10-30 सेंमी लांब, अर्ध गोलाकार, केसाळ झुपकेदार असते. पिक पक्वतेच्या अवस्थेमध्ये कणसात दाणे भरल्यामुळे कणसे खाली झुकतात. वाण परत्वे 70-100 दिवसांच्या कालावधीत हे पिक कापणीस येते.

पौष्टिक लघू तृणधान्य गटातील पिकापैकी जगातील हे एक सर्वात जुने पिक समजले जाते. अनेक वर्षापुर्वी आहारामध्ये मुख्य अन्न म्हणून यापिकाचा समावेश होत होता. जगातील एकूण पौष्टिक तृणधान्य उत्पादनामध्ये राळा पिकाचा दुसरा क्रमांक असून अंदाजे सहा दशलक्ष टन उत्पादन होते.

यापिकाचा वाढीचा वेग जास्त असल्यामुळे कमी दिवसांत जीवनक्रम पूर्ण होत असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही हे पीक स्वत:ला वाचवू शकते. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यास आकस्मित पीक नियोजनात या पिकास भरपूर वाव आहे. महाराष्ट्रात राळा पिकाची पेरणी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत केली जाते. मानवी आहारासोबतच राळा पिकाच्या धान्याचा उपयोग पाळीव पक्षांसाठी खाद्यान्न म्हणून सुद्धा होत आहे. यापिकाच्या कडब्याचा उपयोग जनावरासाठी चारा म्हणून केला जातो.

राळा शरीरासाठी अत्यंत गुणकारी असून यात प्रति 100 ग्रॅम मध्ये प्रथिने 12.30, कार्बोदके 60.09, तंतुमय पदार्थ 8.0, खनिज द्रव्ये, 3.3, लोह 5.0, थायमीन 0.59, लायसीन 3.20, तांबे 1.40, व्हिटॅमिन 0.82 आहे. यात असलेल्या पोषक मूल्यांचा विचार केल्यास राळा पिकास घटकांचा भांडारच म्हणावे लागेलराळ्याच्या सेवनाने रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होतेपोटाचे विका असणाऱ्यांना आणि मधुमेही लोकांना राळा हे वरदान आहेराळा हे पचनासाठी सर्वोत्तम असून कुठल्याही ॲलर्जीपासू मुक्त आहेग्लुटेन फ्री असल्यामुळे ग्लुटेन अलर्जी असलेल्या लोकांसाठी एक पर्यायी धान्य आहे. गर्भवती स्त्रीया आणि मुलांसाठी अत्यंत पौष्टीक आहे. राळ्याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढतेरी जबू आणि निरोगी राहण्यास मदत होते.

00000


No comments:

Post a Comment