Tuesday 26 September 2023

DIO BULDANA NEWS 25.09.2023

 मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणासाठी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध

*दि. 1 ऑक्टोंबरपर्यत सूचना, आक्षेप नोंदविण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. २५ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत पूनरिक्षण पूर्व उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्यात येत आहे. यासाठी मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणासाठी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत दि. 1 ऑक्टोंबर 2023 पर्यत सूचना, आक्षेप नोंदविता येऊ शकणार आहे.
जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुर्नरचना उपक्रमांतर्गत संबधीत मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून नवीन मतदानकेंद्र तयार केल्याबाबतचे प्रारुप प्रस्ताव, मतदान केंद्राच्या नावातील बदलाचे प्रस्ताव,  मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे प्रस्ताव, मतदान केंद्रावर जाण्याकरीता 2 किमीपेक्षा अधिक अंतर असल्यामूळे नव्याने प्रस्तावित केलेली मतदान केंद्र तसेच एकत्र करण्यात आलेले  मतदान केंद्राचे  प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. 
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणी अधिकारी यांनी प्रस्तावित केलेल्या मतदान केंद्राच्या नावातील बदलासह, नवीन मतदान केंद्र प्रस्तावित केलेल्या बदलासह, 1500 मतदारापेक्षा अधिक मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्रामधील मतदार नजिकच्या मतदान केंद्रामध्ये समाविष्ट केल्याबाबतच्या बदलासह व मतदानकेंद्राच्या नावामधील बदलासहची विधानसभा मतदार संघानिहाय मतदान केंद्राची यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, बुलढाणा यांच्या कार्यालयाच्या नोटीसबोर्ड वर त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांचे संकेतस्थळ buldhana.nic.in यावर तसेच जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालय येथे दि. 25 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. 
दा मतदान केंद्राच्या प्रारूप यादीबाबत सूचना, आक्षेप असल्यास दि. 1 ऑक्टोंबर 2023 पर्यत संबंधित विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे तसेच सामान्य निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे दाखल करता येतील. वरील नमूद बदलाचे प्रस्ताव भारत निवड़णूक आयोगाकडून मंजूर झाल्यास सदर एकत्रितरित्या प्रसिध्द होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये सदरचे बदल अंमलात येतील. तसेच त्या आधारे मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुनर्नचना देखील अस्तित्वात येईल, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.
00000

जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित दिनदयाल उपाध्याय यांना अभिवादन
बुलडाणा, दि. २५ : जिल्हाधिकारी कार्यालयात आज पंडित दिनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
निवासी जिल्हाधिकारी शरद पाटील यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, तहसीलदार संजीवनी मोफळे, नाझर गजानन मोतेकर, अवल कारकून शिल्पा पाल आदी उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment