Wednesday 6 September 2023

DIO BULDANA NEWS 05.09.2023

 लेख 1

एका क्लिकवर लाखभर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य 

 *‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात 17 कोटी वितरीत


बुलडाण्यात रविवारी झालेला ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी ठरला. कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना मदतीचे वाटप केले. यात 30 हजार ऑफलाईन, तर 75 हजार लाभार्थ्यांना ऑनलाईन मदतीचे वाटप करण्यात आले. एका क्लिकवर लाखभर लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.


महसूल विभागातील नैसर्गिक आपत्ती पिक नुकसानीसाठी 71 हजार 545 लाभार्थ्यांपैकी 51 हजार 738 लाभार्थ्यांना मदत देण्यात आली. यात डिसेंबर 2021 मध्ये अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या खामगाव तालुक्यातील उर्वरीत 224 लाभार्थी, ऑक्टोबर 2021 मधील मेहकर तालुक्यातील 7 हजार 641 लाभार्थी, जून ते ऑक्टोबर 2022 मध्ये पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 66 हजार 931 लाभार्थ्यांच्या खात्यात लाभ जमा करण्यात आले. तसेच येत्या काळात 62 हजार 854 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. तसेच एप्रिल 2023 मध्ये अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या 826 लाभार्थींना लाभाचे वाटप करण्यात आले.  


याच कार्यक्रमात 12 हजार एपीएल कार्डधारकांना डीबीटीद्वारे 54 लाख रूपयांचा लाभ देण्यात आला. तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, 15 हजार 936 विविध प्रकारचे दाखले आणि एकाला अनुकंपा तत्वावर तलाठी पदावर नियुक्ती पत्र देण्यात आले.


जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाह, महिला बाल कल्याण विभागातर्फे महिला सक्षमीकरणासाठी पिठाची गिरणी, शिलाई मशिन, प्रादेशिक मोटार परिवहन विभागातर्फे दिव्यांग व्यक्तीला वाहन करातून सूट ही मदत देण्यात आली. कार्यक्रमात विविध योजनांचा लाभ देण्यात आला. प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात आले.  


कृषी विभागातर्फे अपघातग्रस्त पाच शेतकऱ्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदानातून दहा लाख रूपयांचा विमा संरक्षण निधी देण्यात आला. कृषी यांत्रिकीकरण ही योजना शेतकऱ्यांना लाभदायक ठरत आहे. यात 195 लाभार्थ्यांना 1 कोटी 28 लाख 47 हजार रूपयांचे वाटप करण्यात आले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील 1 हजार 192 लाभार्थींना 5 कोटी 41 लाख 27 हजार रूपये देण्यात आले. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत 3 हजार 134 लाभार्थ्याना 3 कोटी 24 लाख रूपयांचे वाटप करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) अंतर्गत 1 कोटी 64 लाख 78 हजार रूपयांचे वाटप करण्यात येणार आले. तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, शेतकरी उत्पादक कंपनीला फवारणीसाठी चार लाख रुपयांचे ड्रोन, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन वैयक्तीक शेततळे योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. शेतकऱ्यांना शासन आपल्या दारी उपक्रमातून भक्कम मदत देण्यात आली. यातून कृषि क्षेत्राचा विकास होण्यास मदत मिळणार आहे.


जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतून पीएमएफई, एमकेएपीपीजी फंड, सीआयएफ बी लिंकेज, आदिवासी विकास विभाग, कामगार विभाग विभागातर्फे शैक्षणिक कल्याण, सामाजिक कल्याण, सुरक्षा संच, जिल्हा उद्योग केंद्राकडून उद्योगासाठी अर्थसहाय्य, नगर परिषद बुलडाणातर्फे दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानात 25 लाख 50 हजार रूपयांचे वाटप करण्यात येणार आले. तसेच पीएम स्वनिधीचे वाटप करण्यात आले.


बुलडाणा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे प्रधानमंत्री मातृवंदन योजना, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयातर्फे श्री शिवछत्रपती क्रिडा पुरस्कारार्थीं आणि खेळाडूंना आधुनिक खेळ साहित्य, जिल्हा अग्रणी बँकेतर्फे पीएमएफएमई, मुद्रा योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्र या 31 लाभार्थ्यांना 4 कोटी 17 लाख 14 हजार रूपये वाटप करण्यात येणार आले.


शासन आपल्या दारी कार्यक्रमातून कृषी, उद्योग, क्रिडा, रोजगार, महिला सक्षमीकरण, समाज कल्याण अशा सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात आला. हे लाभ प्रतिनिधिक असले तरी येत्या काळात शासनाच्या योजना लाभार्थ्यांच्या दारापर्यंत जाण्यास मदत मिळाली आहे.


गजानन कोटुरवार,

जिल्हा माहिती अधिकारी,

बुलडाणा.

000000

लेख 2


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वाटप हाच सन्मान


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन आपल्या दारी कार्यक्रमात २८ लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात लाभाचे वितरण करण्यात आले. सन्मानपूर्वक लाभ दिल्याबद्दल लाभार्थी मनातून सुखावले. लाभ मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांच्या हातून लाभ मिळणे हा सन्मान असल्याची भावना लाभार्थ्यांमध्ये होती.

कार्यक्रमात सुनीता प्रशांत खरे, रा. सुंदरखेड, ता. बुलडाणा, यांना पिठाची चक्की, राजू भीमराव हिवाळे, रा. भीमनगर वार्ड, क्रमांक दोन, बुलढाणा, हे दिव्यांग असल्याने वाहन करातून सूट, हरिदास काळमेघ, रा. काकोडा, ता. संग्रामपूर, यांना शेतकरी विमा संरक्षण निधीची मदत, टी. एस. घुले यांच्या कुलाभवानी फार्मर प्रोड्युसर कंपनीला, रा. वडगाव पाटण, ता. जामोद, चार लाख रुपयांचे ड्रोन, रामेश्वर मदनराव कोल्हे, रा. धोडप, ता. चिखली, यांना सामाजिक कल्याण, ज्योती निलेश पाटील, रा. सावरगाव डुकरे, ता. चिखली, यांना कुकुट पालन व्यवसायासाठी मदत, चंद्रकला मनोहर सोनवणे, बुलडाणा, आत्मनिर्भर निधी, शितल पंडीत खंडागळे, रा. कोलवड, ता. बुलडाणा, यांना प्रधानमंत्री मातृवंदन योजना, भूषण विनायक काळे, रा. राऊतवाडी, ता. चिखली, यांना तलाठी पदवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी, सविता गजानन आंधळे, रा. खामगाव, यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय, प्रभाकर शंकर पहूरकर, रा. भानेगाव, ता. शेगाव, यांना प्रधानमंत्री मत्स्य योजनेतून इन्सुलेटेड वाहन, प्रियंका गजानन ताटे, रा. बुलडाणा, यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, लता कृष्णा गवते, रा. चिखली, यांना ई-व्हेईकल, अनुराधा सोळंकी, रा. पाटोदा, ता. चिखली, यांना खेळाचे अद्ययावत साहित्य, सुमेध तायडे व कीर्ती तायडे, रा. संग्रामपूर, यांना अंतरजातीय विवाह अनुदान, पी. पी. सोनुने, रा. मलकापूर, यांना स्मार्ट प्रकल्प, उषा विजय मिसाळ, रा. बुलडाणा, यांना नागरी जीवनोन्नती अभियान, सरला गजानन जाधव, रा. कोलवड, यांना ग्रामीण जीवनोन्नती, निर्मला देशमुख, रा. मेहकर आणि मंगला शेजोळ, रा. देऊळगाव माही दा या दोघीना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रथमेश जवकर, रा. बुलडाणा, यांना धनुर्विद्या खेळासाठी आधुनिक धनुष्यबाण देण्यात आला. ऋषीकेश ढारे, रा. शेगाव, अर्चना जाधव, रा. वरवट बकाल, ता. संग्रामपूर, राहुल लोखंडे, रा. भालगाव, ता. चिखली या युवकांना रोजगार मेळाव्यात रोजगार मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले. तसेच चंद्रयान मोहिमेत सुटे भाग पुरविणारे उद्योजक गितीका जयेश विकमशी आणि राजेंद्र भोसले यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.


शासन आपल्या दारी कार्यक्रमातून शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. योजनेसाठी त्यांचा सक्रीय सहभाग घेण्यात आला. या उपक्रमातून गावागावात योजना पोहचत असून शासकीय योजनांची माहिती नागरिकांना होत आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पुढे येत आहेत. ही शासन आपल्या दारी कार्यक्रमामाची फलश्रृती म्हणावी लागेल.


गजानन कोटुरवार,

जिल्हा माहिती अधिकारी,

बुलडाणा.

000000


लेख 3

'शासन आपल्या दारी'तून 618 कोटी वितरीत

शासन आपल्या दारी या उपक्रमाचा मुख्य उद्देशच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना शासकीय योजनांची माहिती देणे आणि ते ज्या योजनेसाठी पात्र आहेत, त्या योजना त्यांना उपलब्ध करून देणे हा आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या चार महिन्यापासून शासन आपल्या दारी हा उपक्रम गावपातळी ते जिल्हा पातळीपर्यंत राबविण्यात येत आहे. यातून तब्बल 17 लाख 43 हजार 213 लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात आले आहे. यात त्यांना 618 कोटी रुपयांचे विविध लाभ आणि अनुदान वितरित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने गेल्या काळात घेतलेल्या सकारात्मक प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे.
शासन आपल्या दारीमध्ये 17 लाख 43 हजार एकूण लाभार्थी असले तरी यात सात लाख 30 हजार 489 लाभार्थी हे पिक विमा योजनेंतर्गत नोंदणी केलेले शेतकरी आहेत. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील 23 विविध विभाग आणि महामंडळांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यामुळे जिल्ह्यातील दहा लाख 4 हजार 641 निवड लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे शक्य झाले.
या अभियानात कृषी, पोलीस, महावितरण, आदिवासी विकास, महसूल, नैसर्गिक आपत्ती, महामंडळे, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला व बालविकास, नगर विकास, अग्रणी बँक, समाज कल्याण, क्रीडा विभाग, रोहयो, पशुसंवर्धन, मत्स्य विभाग, वन, कामगार, आरोग्य, जिल्हा उद्योग केंद्र यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या विभागाच्या सक्रिय सहभागामुळेच हे अभियान यशस्वी झाले.
आरोग्य विभागाने दोन लाख ७४ हजार १५९ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून 32 कोटी रुपयांची अनुदान वितरित केले. तसेच कृषी विभागाने दोन लाख 51 हजार 433 लाभार्थ्यांना 63 कोटी रुपयांची अनुदान गेल्या काळात वितरित केले आहे. कामगार विभागाने 29 हजार 252 लाभार्थ्यांना 28 कोटीचे वितरण केले आहे. कोणतेही तारण न ठेवता कर्ज मिळण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना लोकप्रिय झाली आहे. या योजनेत जिल्हा अग्रणी बँकेने पुढाकार घेऊन एक लाख 44 हजार 497 लाभार्थ्यांना 246 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे. त्यासोबतच शासनाने यावर्षीपासून एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेस शेतकऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. शासन आपल्या दारी या योजनेतून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून तब्बल सात लाख 30 हजार 489 शेतकऱ्यांनी या हंगामातील पिक विमासाठी नोंदणी केली आहे.
एकूणच शासकीय यंत्रणांचा शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रती असलेला सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रयत्न यामुळे 17 लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबर लोकप्रतिनिधी आणि समाजातील जाणकारांनी उपक्रम राबविण्यात सहकार्य केल्याने अमरावती विभागातील बुलडाणा येथे झालेला पहिला शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.

गजानन कोटुरवार,
जिल्हा माहिती अधिकारी,
बुलडाणा.
000000

No comments:

Post a Comment