Saturday 2 September 2023

DIO BULDANA NEWS 02.09.2023












 विभागीय आयुक्तांकडून पूर्वतयारीचा आढावा

*अमरावती विभागातील पहिला कार्यक्रम

बुलडाणा, दि. 2 : राज्य शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ हा सामान्य जनतेला एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ व मदत वितरणाचा कार्यक्रम रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे संपूर्ण तयारी झाली आहे. अमरावती विभागात प्रथमच हा कार्यक्रम होत असून कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांसाठी याठिकाणी सर्व अनुषंगिक सोयी-सुविधा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले.

विभागीय आयुक्तांनी आज प्रत्यक्ष कऱ्हाळे लेआउट येथे होणाऱ्या कार्यक्रम स्थळी भेट देऊन पाहणी करुन तेथील पूर्वतयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य पथक, पोलीस बंदोबस्त आदी बाबी सुसज्ज ठेवाव्यात, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले. प्र. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक सुनील कडासने तसेच इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 11.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. यात 30 हजार ऑफलाईन, तर 75 हजार लाभार्थ्यांपैकी ईकेवायसी झालेल्या लाभार्थ्यांना ऑनलाईन मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाला सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहतील.

पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख पाहुणे खासदार प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धिरज लिंगाडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेताताई महाले, राजेश एकडे, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांनी केले आहे.

शासन आपल्या दारी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती असणारी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, संजय गायकवाड, विभागीय आयुक्त निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉ. अमोल शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

दरम्यान विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी बुलडाणा तालुक्यातील सागवान ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेतून झालेल्या वृक्ष लागवडीच्या कामाची तपासणी केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पवार उपस्थित होत्या. याठिकाणी कडू बदाम, कांचन आणि शिसम या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

00000

आज ‘शासन आपल्या दारी’चा जिल्हास्तरीय लाभ वाटप

बुलडाणा, दि. 2 : ‘शासन आपल्या दारी’चा बुलडाणा जिल्हास्तरीय लाभ वाटप कार्यक्रम रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता कऱ्हाळे ले आऊट जवळ, परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेमागे, मलकापूर रोड येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख पाहुणे खासदार प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धिरज लिंगाडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेताताई महाले, राजेश एकडे, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांनी केले आहे. 

00000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा

बुलडाणा, दि. 2 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. श्री. शिंदे यांच्या हस्ते शासन आपल्या दारीचा जिल्हास्तरीय लाभ वाटप आणि शहर पोलिस ठाण्याचे लोकार्पण होणार आहे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या दौऱ्यानुसार, रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता बुलडाणा येथील कऱ्हाळे ले आऊट जवळील हेलिपॅड येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता कऱ्हाळे ले आऊट जवळ. परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेमागे, मलकापूर रोड, बुलडाणा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता बुलडाणा शहर पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 2.15 वाजता शहर पोलिस ठाणे येथून कऱ्हाळे ले आऊट जवळील हेलिपॅड कडे प्रयाण करतील. त्यानंतर दुपारी 2.25 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण करतील.

00000

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दौरा

बुलडाणा, दि. 2 : पालकमंत्री गुलाबराव पाटील रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

श्री. पाटील यांच्या दौऱ्यानुसार, रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11.20 वाजता बुलडाणा येथील कऱ्हाळे ले आऊट जवळील हेलिपॅड येथे मुख्यमंत्री यांच्या आगमन प्रसंगी उपस्थित राहतील. सकाळी 11.30 वाजता कऱ्हाळे ले आऊट जवळ. परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेमागे, मलकापूर रोड, बुलडाणा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता बुलडाणा शहर पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर सोईनुसार पाळधी, ता. जळगाव कडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment