निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडावी - पोलीस निवडणूक निरीक्षक गुरमितसिंग चौहान बुलढाण्यात दाखल ; पोलीस प्रशासनाच्या तयारीचा घेतला आढावा
निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडावी - पोलीस निवडणूक निरीक्षक गुरमितसिंग चौहान बुलढाण्यात दाखल ; पोलीस प्रशासनाच्या तयारीचा घेतला आढावा बुलढाणा, दि.29 (जिमाका): जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडावी. त्यासाठी पोलीस प्रशासनाने जबाबदारीपूर्वक काम करावे, असे निर्देश पोलीस निवडणूक निरीक्षक गुरमितसिंग चौहान यांनी पोलीस प्रशासनाला दिले. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने पोलीस निवडणूक निरीक्षक म्हणून नेमलेले भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी गुरमितसिंग चौहान बुलढाण्यात दाखल झाले आहेत. त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. किरण पाटील आणि पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. या आढावा बैठकीला अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, निवासी उपजिल्हाधिकारी अजिंक्य गोडगे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, जयश्री ठाकरे, मुख्य लेखा व...