DIO BULDANA NEWS 30.04.2024

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी बुलडाणा, दि. 30 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, अक्षय गाडगे, नाझर गजानन मोतेकर, सुरेश खोडके आदी उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन केले. 000000 महाराष्ट्र दिनानिमित्त आज ध्वजारोहण बुलडाणा, दि. 30 : महाराष्ट्र दिनाच्या 64वा वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दि. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पोलिस कवायत मैदान येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. 00000 पाणीटंचाई निवारणासाठी टँकर मं जूर बुलडाणा, दि. 30 : जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थितीत पिण्याच्या स्त्रोतापासून आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे देऊळगाव राजा तालुक्यातील तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा क...