DIO BULDANA NEWS 31.03.2024
.jpeg)
नवमतदार नोंदणी, जागृतीसाठी निवडणूक साक्षरता मंडळ लोकशाहीच्या उत्सवात युवकांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील बुलडाणा, दि. 31 : विद्यार्थीदशेपासूनच युवकांना देशातील निवडणूक प्रक्रिया, मतदानाचा अधिकाराची माहिती करुन देणे, तसेच मतदार नोंदणी आणि विविधस्तरावरील निवडणूक कार्यक्रमाबद्दल ज्ञान वृद्धींगत करण्यासाठी जिल्ह्यातील ३५३ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. सशक्त लोकशाही व्यवस्थेसाठी निवडणूक प्रक्रिया, मतदार नोंदणी आणि जाणीव जागृती यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. भारतीय निवडणूक प्रक्रियेविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करुन लोकप्रतिनिधी आणि मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वृद्धींगत करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सदर मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळामध्ये नववी ते पदवी शिक्षणासाठी प्रवेशित सर्व विद्यार्थी सदस्य म्हणून सहभागी राहणार ...