Tuesday 20 February 2024

DIO BULDANA NEWS 20.02.2024

 डाक विभागातर्फे महामेळावा उत्साहात

बुलडाणा, दि. 20 : डाक विभागातर्फे या आर्थिक वर्षात ‘नया साल, नया जोश' हा उपक्रम दि. 29 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे. नागरिकांना डाक विभागाच्या सेवांचा लाभ मिळावा, तसेच वित्तीय समावेशन व्हावे, यासाठी बुलडाणा येथील डाक विभागात शनिवारी, दि. 17 फेब्रुवारी रोजी डाक महामेळावा पार पडला.

यावेळी सहायक डाक निर्देशक दिलीप खाडे, सहाय्यक अधि
क्षक डाकघर जयंत दाऊ, डाक अधिक्षक गणेश अंभोरे उपस्थित होते.

श्री. खाडे म्हणाले, डाक विभाग आधुनिकीकरणाची कास धरत आहे. तसेच सर्व सेवा नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. तसेच श्री. दाऊ यांनी आजच्या संगणकाच्या युगातही डाक विभागाने आपली विश्वासार्हता जपल्याचे सांगितले. श्री. आंभोरे यांनी डाक विभागाच्या योजनांची माहिती दिली. या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. तसेच भविष्यातही डाक विभाग जनसामान्यांना विविध सेवा प्रदान करण्यासाठी कटीबद्ध राहिल, असे आश्वासन दिले. प्रल्हाद कचरे यांनी सूत्रसंचालन केले.

या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बुलडाणा डाक विभागाने दि. 29 जानेवारी 2024 पासून दि. 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत बचत व तत्सम 42 हजारापेक्षा जास्त खाती काढून महाराष्ट्र सर्कलमध्ये प्रथम स्थान प्राप्त केले आहे.

डाक विभागातर्फे ग्राह‌कांसाठी विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. त्यात नागरिकांचे वित्तीय समावेशन करण्याच्या उद्देशाने भारतीय डाक विभागाद्वारे बचत बँक, आवर्ती जमा, सावधि जमा, महिला सन्मान, सुकन्या, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आदी योजना पुरविल्या जाते.

00000



जिल्हाधिकारी कार्यालयात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन

बुलडाणा, दि. 20 : जिल्हाधिकारी कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करण्यात आले.

तहसिलदार माया माने यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिलदार संजिवनी मुपळे, वर्षा मुळे, नाझर गजानन मोतेकर आदी उपस्थित होते. उपस्थितांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

00000


No comments:

Post a Comment