Friday 9 February 2024

DIO BULDANA NEWS 09.02.2024

 महासंस्कृती महोत्सवात शासकीय योजनांचा लाभ

*नागरिकांनी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 9 : जिल्ह्यातील खामति गाव आणि चिखली येथे पर्यटन व सांस्कृतिक विभागातर्फे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन दि. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. खामगाव येथील महासंस्कृती महोत्सवादरम्यान शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात येणार आहे. याठिकाणी ई-केवायसी सह अन्य सेवांचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी आधारकार्ड आणि बँक पासबुकची प्रत घेऊन यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवात शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल राहणार आहे. यात शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यात विविध योजनांच्या लाभासाठी लागणारे ई-केवायसीचा स्टॉल राहणार आहे. तसेच दिव्यांग, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना, रहिवासी प्रमाणापत्र, जात प्रमाणपत्र यासह आदी ऑनलाईन सुविधा याठिकाणी देण्यात येणार आहे. लाभ घ्यावयाचा असल्यास नागरिकांनी कागदपत्रांसह बँक खात्याच्या पासबुकची प्रत आणि आधार कार्ड घेऊन यावे. यामुळे नोंदणी करणे शक्य होईल.

शासकीय योजनांच्या माहितीसह जनआरोग्य, खाद्यसंस्कृती कृषी विषयक माहिती, योजनांची माहिती, पर्यटन, बचतगट निर्मित वस्तू विक्री, पुस्तक प्रदर्शन, अग्रणी बँकेमार्फत मुद्रा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाबाबत याठिकाणी माहिती देण्यात येणार आहे. नागरिकांनी महासंस्कृती महोत्सवाच्या दरम्यान देण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

खामगाव येथील नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे. सोमवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी संगीत रजनी होणार असून यात राहूल सक्सेना आणि त्यांचा संच मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर करतील. त्यानंतर मंगळवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनवर आधारीत महानाट्य ‘निश्चय पूर्तीचा महामेरू’ होणार आहे. तसेच शनिवार, दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मॅरेथॉन आणि सकाळी साडेनऊ वाजता रांगोळी स्पर्धा होणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी बचतगटांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून खाद्य संस्कृतीचे आयोजन करण्यात आले आहे.

000000

रास्त भाव दुकान परवान्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध

बुलडाणा, दि. 9 : जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ठिकाणी नव्याने रास्त भाव दुकाने परवाना मंजूर करण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून संबंधित गावात जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शासनाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील तरतुदीनुसार नवीन रास्त भाव दुकान परवाने प्राथम्यानुसार मंजूर करण्यात येणार आहेत. यात पंचायतमध्ये ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयं सहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयं सहायता बचत गअ व महिलांच्या सहकारी संस्थांचा समावेश आहे.

बुलडाणा तालुक्यात बुलडाणा, दत्तपूर, चिखली तालुक्यात अमडापूर, सावरखेड बु., वाघापूर, सिंदखेड राजा तालुक्यात सोनोशी, बाळसमुद्र, देऊळगाव राजा तालुक्यात दिग्रस बु. देऊळगाव राजा येथे दोन, मेहकर तालुक्यात वडाळी, नानज, मोताळा तालुक्यात सांगळद, चिंचखेड खुर्द,  डिडोळा खुर्द, शेगाव तालुक्यात महागाव, सांगवा, नांदुरा तालुक्यात दहिवडी, अंबोड, सावरगाव चाहू, भुईशेंगा, इसबपूर, नारायणपूर, रोटी, खातखेड, पिंपळखुटा खुर्द, जिगाव, हिंगणाभोटा, जळगाव जमोद तालुक्यात पळसखेड, आडोळ खुर्द, उसरा खुर्द, निमकराड, ईस्लामपूर, खामगाव तालुक्यात खामगाव येथे आठ, पिंपळगाव राजा, उमरा लासुरा, आमसरी, कुऱ्हा, मांडणी, शेंद्री, धापटी, चिखली खुर्द, नागझरी खुर्द, संग्रामपूर तालुक्यात सावळा, मारोड, दानापूर, इटखेड, शेवगा खुर्द, खळद, पंचाळा बु., हिंगणा कवठळ, भोन, धामनगाव, मनार्डी, निमखेड, लोणार तालुक्यात गुंधा, पिंपळनेर, लोणार, मलकापूर तालुक्यात पिंपळखुटा बु., लासुरा येथे येथे नवीन रास्तदुकान परवाना मंजूर करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी आर. एम. बसैय्ये यांनी कळविले आहे.

00000

वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 9 : जिल्हा परिषद सेस अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना थेट हस्तांतरणद्वारे अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे जिल्हा परिषद सेस २०२३-२४ या वर्षामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला आणि मुली यांचे यांचे करिता वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ थेट हस्तांतरण द्यावयाचा आहे. त्यासाठी लाभार्थी हिस्सा १० टक्के व ९० टक्के शासकीय अनुदान आहे. यासाठी दि. २२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. यात ग्रामीण भागातील अपंग महिला व अपंग मुलींना पिठाची चक्की पुरविणे, ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिक्को व फॉल मशिन पुरविणे या योजनांचा समावेश आहे.

सदर योजनांचे अर्ज तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहेत. लाभार्थी यांनी आवश्यक कागदपत्रासह, तसेच अटी व शर्तीसह अर्ज भरून द्यावे. अटी व शर्तीची पुर्तता करीत असल्यास आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला प्राधान्य राहणार आहे. योजनाशी संबधित अर्ज, तसेच अटी व शर्ती कार्यालय, तसेच प्रत्येक तालुक्यातील सर्व बालविकास प्रकल्प कार्यालय व zpbuldhana.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment