Tuesday 20 February 2024

DIO BULDANA NEWS 18.02.2024

 

वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


बुलडाणा, दि. १८ : जिल्हा परिषदेच्या यावर्षीच्या सेस फंडातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला आणि मुलींकरिता वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ थेट हस्तांतरणने देण्यात येणार आहे. यासाठी दि.२२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.
या योजनेतून ग्रामीण भागातील दिव्यांग महिला दिव्यांग मुलींना पिठाची चक्की पुरविणे आणि ग्रामीण भागातील महिला मुलींना पिको फॉल मशिन पुरविण्यात येणार आहे. सदर योजनांचे अर्ज हे प्रत्येक तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय येथे उपलब्ध आहेत. लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावे लागणार आहे. अटी शर्तीची पुर्तता करीत असल्यास आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेशी संबधित अर्ज तसेच अटी शर्ती कार्यालयात, तसेच प्रत्येक तालुक्यातील सर्व बालविकास प्रकल्प कार्यालय  zpbuldhana.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे जिल्हा परिषदेचे बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.
000000
शारीरिक शिक्षण शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर उत्साहात


बुलडाणा, दि. १८ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हास्तर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे निवासी प्रशिक्षण शिबीर दि. 9 ते 16 फेब्रुवारी 2024 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात पार पडले.
सदर प्रशिक्षण शिबीरात क्रीडा शिक्षकांना उजळणी म्हणून विविध खेळात झालेले बदल, खेळामधील बदललेले तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती, खेळामधील कौशल्याची ओळख, नवीन खेळांची ओळख, खेळांची शास्त्रोक्त माहिती, क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी वेळोवेळी क्रीडा क्षेत्रामध्ये होणारे बदल अवगत याबाबत माहिती देण्यात आली
सदर शिबीराकरीता योगासाठी डॉ. तृप्ती महाले, आहार शास्त्रासाठी डॉ. साधना भवटे, स्पोर्टस् इन्जुरीबाबत डॉ.अनुप इंगळे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. लता बाहेकर, स्काऊट आणि गाईडकरीता श्री. आठवले, श्रीमती पवार आणि विविध खेळांसाठी तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले
शिबीराचा समारोप दि.16 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आला. यावेळी क्रीडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर, व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव संजय नाईक उपस्थित होते. यात राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. शिबीर प्रमुख उज्वला लांडगे प्रास्ताविक केले. सतीशकुमार पडूळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रविणकुमार राठोड यांनी आभार मानले.
०००००

No comments:

Post a Comment