Tuesday 20 February 2024

DIO BULDANA NEWS 17.02.2024

 जिल्ह्यात आज शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन

बुलडाणा, दि. १७ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षेची भावना निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, याकरीता परीक्षेचे योगदान महत्वाचे ठरत आहे.
सदर परीक्षा ही जिल्ह्यातील 13 तालुक्यात आयोजित करण्यात आली आहेया पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 215 केंद्र राहणार असून 11 हजार 327 विद्यार्थी परीक्षा देणार आहे. तसेच आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 98 केंद्र राहणार असून दहा हजार तीन विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तेजराव नरवाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सिध्देश्वर काळुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. आर. खरातनिरंतर विभाग शिक्षणाधिकारी वैशाली ठग, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, उमेश जैन, शिक्षण विस्तार अधिकारी जयमाला राठोड, जिल्हा परीक्षा समन्वयक परिश्रम घेत आहेत.
00000

सोमवारी मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश

बुलडाणा, दि. १७ : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सोमवार, दि. 19 फेब्रुवारी रोजी सर्व प्रकारची मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे

छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोमवारी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. जयंती उत्सवानिमित्त संपूर्ण जिल्ह्यामध्ये शोभायात्रेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व वयोगाटातील आबालवृध्द जनसमुदाय जमा होणार आहे. तसेच राज्यात विशेषतः जिल्ह्यात विविध समाजातील विविध प्रवर्गातील नागरीकांच्या मागण्यांबाबत आंदोलने, मोर्चे, निदर्शने इत्यादी कारणांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सदर उत्सव कालावधीत कायदा सुव्यवस्था, तसेच सार्वजनिक शांतता अबाधित रहावी, यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारीचा उपाय योजना म्हणून जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ चे कलम १४२ नुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करुन सोमवार, दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील सर्व किरकोळ घाऊक देशी, विदेशी मद्य विक्री अनुज्ञाप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

याबाबत अनुज्ञप्ती धारकांनी सोमवारी मद्यविक्री बंद ठेवण्याची दक्षता घ्यावी. सदर आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्ती धारकांविरुध्द कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

00000000

No comments:

Post a Comment