Saturday 8 January 2022

DIO BULDANA NEWS 8.1.2022

 



जिजामाता महाविद्यालयाच्या आवारात ड्रोनचे प्रात्यक्षिक

     बुलडाणा, (जिमाका) दि. 8:  जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागाच्या वतीने गावठाणचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या ड्रोन सर्वेक्षणाचे प्रात्यक्षिक आज अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे  यांच्या समक्ष जिजामाता महाविद्यालयाचे आवारात करण्यात आले.  यावेळी तहसीलदार रुपेश खंडारे, गटविकास अधिकारी श्री. वाघ, विस्तार अधिकारी श्री. गीते, भारतीय सर्वेक्षण विभागाचे अधिकारी श्री. अंभोरे, उपअधीक्षक श्री.  सवडतकर,  उप अधिक्षक भूमी अभिलेखचे कर्मचारी उपस्थित होते.
*************
जिल्हा उद्योग केंद्रामार्फत केवळ चार टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध
*जिल्हा उद्योग केंद्राची कर्ज योजना
बुलडाणा, (जिमाका) दि. 8: जिल्हा उद्योग केंद्रामार्फत केवळ चार टक्के व्याज दराने सॉफ्ट लॉन उपलब्ध आहे. या सॉफ्ट कर्ज योजनेसाठी शिक्षणाची व वयाची अट नाही. मात्र संबंधित उद्योग करण्यासाठीं आवश्यक कौशल्य वा अनुभव असणे आवश्यक आहे. यामध्ये वंश परंपरागत व्यवसाय असणाऱ्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 
योजनेच्या माध्यमातून एक लाख लोकसंख्या (२०११च्या जनगणनेनुसार) असणाऱ्या गावात नवीन उद्योग सूरू करता येणार आहे. या उद्योगामध्ये  फक्त लघु आणि सेवा उद्योगांचा समावेश राहणार आहे. या उद्योग प्रकल्पाचा जास्तीत जास्त खर्च दोन लाख पावेतो असणार आहे. या उद्योगाला बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्पाच्या २० टक्के अथवा ४० हजार पावेतो व अनु. जाती /जमाती प्रवर्गा करीता ३० टक्के  अथवा ६० हजार पावेतो चार टक्के व्याजदराने देय राहणार आहे. अधिक माहितीसाठी  जिल्हा उद्योग केंद्र, मलकापूर रोड, बुलडाणा येथे संपर्क साधावा. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने सॉफ्ट लोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी इच्छुक व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. 
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे
विहित नमुन्यातील दोन प्रतीत अर्ज, लघु उद्योगाची नोंदणी, जागा मालकाचे संमतीपत्र किंवा जागेचा भडेपट्टा किंवा टॅक्स पावती, ग्रामपंचायत अथवा नगर पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र, यंत्रसामुग्री अथवा फर्निचरचे दरपत्रक, जर बांधकाम करावयाचे असल्यास बांधकामाचे अंदाजपत्रक, अनु जाती किंवा अनु जमाती प्रवर्गाचा अर्जदार असल्यास जातीचे प्रमाणपत्र असावे. 

No comments:

Post a Comment