Monday 24 January 2022

राष्ट्रध्वजाचा राखा सन्मान.. वाढेल देशाचा अभिमान !...

 राष्ट्रध्वजाचा राखा सन्मान.. वाढेल देशाचा अभिमान !...

· हँण्ड स्पून राष्ट्रध्वज पायदळी तुडवू नका

बुलडाणा,(जिमाका) दि.24 : दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. सदर कार्यक्रम पार पाडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लास्टीकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले दिसतात, असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.

    राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबतच्या तरतुदी आहेत. राष्ट्रध्वज हा हँण्ड स्पून आणि हस्तनिर्मित वूल, कॉटन, सिल्क आदीमध्ये असावा. राष्ट्रध्वजाचा आकार आयाताकृती, त्याची उंची व रुंदी 3:2 असावी. राष्ट्रध्वजाचा आकार 9 प्रकारात पुढीलप्रमाणे असायला पाहिजे. त्याचा आकार प्रकारानुसार लांबी व रुंदी दिली आहे. प्रकार 1 - लांबी, रुंदी अनुक्रमे 6300 व 4200 मी.मी, प्रकार 2 – लांबी व रुंदी अनुक्रमे 3600 व 2400, प्रकार 3- लांबी, रुंदी अनुक्रमे 2700 व 1800, प्रकार 4- लांबी, रुंदी अनुक्रमे 1800 व 1200, प्रकार 5 - लांबी, रुंदी अनुक्रमे 1350 व 900, प्रकार 6 - लांबी, रुंदी अनुक्रमे 900 व 600, प्रकार 7- लांबी, रुंदी अनुक्रमे 450 व 300, प्रकार 8- लांबी, रुंदी अनुक्रमे 225 व 150, प्रकार 9 - लांबी, रुंदी अनुक्रमे 150 व 100 मी.मी असावी. राष्ट्रध्वजाचा व्हीव्हीआयपी विमानासाठी आकार 450 बाय 100 मी.मी, मोटार कारसाठी 225 बाय 150 मी.मी आणि टेबलसाठी 150 बाय 100 मी.मी असावा.

    भारतीय ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतूदीनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करताना खराब झालेल्या, माती लागलेल्या ध्वजाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. याठिकाणी पायदळी तुडविलेले राष्ट्रध्वज गोळा करून तालुका व जिल्हा स्तरावर निर्मित करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहे. त्यांनी असे राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावे. खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सुर्यास्तानंतर व सुर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक जाळून नष्ट करावे. हे करताना उपस्थितांनी उभे रहावे व जाळून पुर्णपणे नष्ट होईपर्यंत जागा सोडू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.  

********

राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाचे 25 जानेवारी रोजी आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.24 : भारत निवडणूक आयोगाकडून सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणूका ही थीम देण्यात आली आहे. या थीमने 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कोविड 19 च्या निर्बंधाच्या अनुषंगाने सदर कार्यक्रम जिल्हास्तरावर ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शपथ घेण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये ऑनलाईन पद्धतीने https://meet.google.com/oez-ehrq-rmb या लिंकचा वापर करून सर्व महाविद्यालये, मतदार, नागरिक यांना सहभागी होता येणार आहे. या कार्यक्रमात नवमतदारांना प्रातिनिधीक तत्वावर इपिक कार्ड चे वाटप करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी 25 जानेवारी 2022 रोजी जिल्हास्तरावरून आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमामध्ये सोबतच्या लिंकचा वापर करून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment