Tuesday 25 January 2022

DIO BULDANA NEWS 25.1.2022

 


श्रवण यंत्राच्या उपयोगामुळे जीवनमान सुसह्य होण्यास मदत

-          पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

  • सिंदखेड राजा येथे श्रवण यंत्र वाटप कार्यक्रम

बुलडाणा, (जिमाका) दि.25 : राज्यातील सर्वसामान्य लोकांचे जीवनमान सुधाराण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी दिव्यांग, कर्णबधीर यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी आज 25 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोफत श्रवण यंत्र वाटप या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातही कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक गरजवंतांना याचा फायदा व्हावा, अशी आमची भावना आहे. त्या अनुषंगाने गरजवंतांनी या श्रवण यंत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.

  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, स्वरूप चॅरिटेबल फाउंडेशन, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र औरंगाबाद, महात्मा गांधी सेवा संघ औरंगाबाद,  बुलडाणा जिल्हा नियोजन निधी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डिजिटल श्रवण यंत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन सिंदखेड राजा स्थित काळा कोट येथील संग्रहालय येथे करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष सतीश तायडे, उपनगराध्यक्ष विजुभाऊ तायडे,  जि.प समाज कल्याण सभापती सौ पुनमताई राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक श्री. तडस, उपविभागीय अधिकारी भूषण आहिरे, तहसीलदार सुनील सावंत,  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जिल्ह्याचे नरेश  शेळके, पंचायत समिती सभापती सौ मीनाताई बंगाळे, जि.प सदस्य सर्वश्री दिनकर बापू देशमुख, राम जाधव, पंचायत समिती माजी सभापती शिवाजीराजे जाधव, सतीश काळे, सीताराम चौधरी, शाम मेहत्रे, गणेश झोरे, शेख आजीम, पंचायत समिती माजी उपसभापती सुनील जगताप आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. संचालन ॲड संदीप मेहेत्रे यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र अंभोरे यांनी मानले.

***********

ई श्रम पोर्टलवर जिल्ह्यात 1 लक्ष 66 हजार 158 कामगारांची नोंदणी   

बुलडाणा, (जिमाका) दि.25 : जिल्ह्यात ई श्रम पोर्टलद्वारे नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 1 लक्ष 66 हजार 158 एवढ्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ठिक ठिकाणी शिबिरे घेण्यात येत आहेत. विट भट्टी, खाणी अशा ठिकाणी पोहचून कामगारांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी पुढाकार घेवून नोंदणी करून घ्यावी. ई श्रम पोर्टलवर जिल्ह्याकरीता 10 लक्ष 226 एवढे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. विट भट्टी व इतर व्यवसायांच्या मालकांनीही आपल्या कामगारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे. असंघटीत बांधवांनी नोंदणी करून घेवून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी केले आहे.

   जिल्हाधिकारी कार्यालयात असंघटीत कामगारांसाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती,बुलडाणा यांच्यासमवेत झालेल्या ई श्रम पोर्टल व असंघटीत कामगारांसाठीच्या योजनांबाबत 24 जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी सरकारी कामगार अधिकारी श्री. राठोड आदी उपस्थित होते.  योजनेमध्ये नोंदणी विनामूल्य असून असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत वार्षिक अंशदान केंद्रशासन भरणार आहे. या योजनेत बांधकाम कामगार, विटभट्टी कामगार, शेतमजूर, फेरीवाले फळ-भाजी विक्रेते, रोजंदारीवर काम करणारे कामगार, असंघटीत क्षेत्रातील व सुमारे 300 उद्योग व व्यवसाय येतात. असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी सद्यस्थिती केंद्र शासनामार्फत ई-श्रम कार्ड योजना राबविण्यात येत आहे. योजनेत नोंदणी करण्याकरीता असंघटीत कामगारांचे वय 16 ते 59 वर्ष असावे. तो प्राप्ती कर भरणारा नसावा, ईपीएफ व ईएसआयसी चा सदस्य नसावा.

  असंघटीत कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला दोन लाख रूपये अर्थसहाय्य मिळणार आहे. त्याचप्रमाणे अपघातात पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रूपये व अंशत: अपंगत्व आल्यास 1 लाख रूपयांची तरतूद या विमा योजनेत आहे.  त्यासाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, वारसदाराचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. नोंदणी ऑनलाईन ई-श्रम पोर्टलवर स्वत: नोंदणी करता येते. किंवा सीएससी केंद्रावर जावून अथवा www.eshram.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येते, अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी श्री. राठोड यांनी दिली आहे.

                                                                        ******

प्रजासत्ताक दिनी शासकीय सुट्टीमुळे दिव्यांग तपासणी बोर्ड रद्द    

बुलडाणा, (जिमाका) दि.25 : जिल्हा सामान्य रूग्णालय, बुलडाणा येथे नियमितपणे दिव्यांग बोर्ड सुरू असते. येणाऱ्या 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे चौथ्या बुधवारी 26 जानेवारी 2022 रोजी जिल्हा रूग्णालय येथील अस्थिव्यंग, नेत्र संबधित दिव्यांग तपासणी बोर्ड रद्द करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी जिल्हा रूग्णालय येथील सदर दिव्यांग तपासणी शिबिरास येवू नये, आल्यास झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणर नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

                                                            *********  

डॉ झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करावे

· 11 फेब्रुवारी 2022 अंतिम मुदत

· प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि.25 : डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने अंतर्गत राज्यातील धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत मदरशांना पायाभुत सुविधांसाठी अनुदान देण्यात येत आहे. सदर अनुदान जास्तीत जास्त 2 लक्ष रूपये इतक्या मर्यादेपर्यंत देण्यात येणार आहे. तरी इच्छूक पात्र मदरशांनी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावे. सदर प्रस्ताव 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करावे. मदरसा चालविणारी संस्था अथवा मदरसा, धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत, अशा मदरसांना सदर योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच ज्या मदरसांना स्कीम फॉर प्रोव्हाईडींग क्वालीटी एज्युकेशन इन मदरसा या केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत लाभ मिळाला आहे, अशा मदरशांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही. शासन निर्णय तरतुदीनुसार जास्तीत जास्त 3 डीएड / बीएड शिक्षकांना मानधन देण्यात येईल. शिक्षणासाठी हिंदी, इंग्रजी, मराठी, ऊर्दू यापैकी एका माध्यमाची निवड करून त्यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे अनिवार्य राहील. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

     प्रस्ताव 11.10.2013 च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सादर करावे. तरी जिल्ह्यातील सदर योजनेतंर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या पात्र निवासी मदरसांनी दिनांक 11.10.2013 च्या शासन निर्णयामधील निकषांनुसार विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेले प्रस्ताव कागदपत्रांच्या पुर्ततेसह अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करावे व या योजनेचा लाभ घ्यावा. अंतिम दिनांकाची प्रतिक्षा न करता तात्काळ प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.

                                                                        ************

कोरोना अलर्ट : प्राप्त 1067 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 211 पॉझिटिव्ह

  • 206 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1278 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1067 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 211 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 92 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 119 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 98 तर रॅपिड टेस्टमधील 969 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1067 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 63, बुलडाणा तालुका : माळविहीर 2, देऊळघाट 1, भादोला 2, चांडोळ 7, मासरूळ 1,अटकळ 1,पळसखेड नागो 1, तांदुळवाडी 1, बिरसिंगपूर 1, मोताळा  शहर : 2, मोताळा तालुका : वडगांव 1, अंत्री 4, धरणगांव 2, टाकळी 2, डिडोळा 2, वाघजळ 1, बोराखेडी 1, शेलगांव बाजार 2, पिंपळपाटी 1, मलकापूर शहर : 10, मलकापूर तालुका : दाताळा 1, संग्रामपूर तालुका : वरवट बकाल 1, सोनाळा 1, खामगांव शहर : 11, खामगांव तालुका : हिवरखेड 3, नांद्री 1, दिवठाणा 1, मांडका 1, रोहणा 1, हिवरा बु 2, नांदुर शहर : 14, नांदुरा तालुका : महाळुंगी 2, वसाडी 1, निमगांव 2, दहीवडी 1, वडनेर 2, टाकरखेड 2, बेलुरा 5, खैरा 1, शेगांव शहर : 2, दे. राजा शहर : 8, दे. राजा तालुका : तुळजापूर 1, गिरोली 1, किन्ही पवार 1, मेंडगांव 2, लोणार तालुका : कारेगांव 1, पिंपरी 2, हिवरखेड 1, सैंधव 1, चोरपांग्रा 1, चिखला 1, भुमराळा 1, बिबी 1,   वेणी 2, चिखली शहर : 6,  तालुका : भालगांव 2, तेल्हारा 1, शेलगांव जहा 1, ढासाळा 1,  कोलारा 2, जळगांव जामोद शहर : 2, सिं. राजा शहर : 1,  अशाप्रकारे जिल्ह्यात 297 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 206 रूग्ण कोरोनामुक्त झााले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 770130 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 88487 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 88487 आहे.  आज रोजी 537 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 770130 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 91628 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 88487 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 2462 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 679 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  


--

No comments:

Post a Comment