Thursday 27 January 2022

DIO BULDANA NEWS 27.1.2022

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 574 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 243 पॉझिटिव्ह

  • 323 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 817 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 574 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 243 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 232 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 459 तर रॅपिड टेस्टमधील 115 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 574 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 29, बुलडाणा तालुका : धामणगांव 1, डोंगरखंडाळा 1, नांद्राकोळी 1, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : उबाळखेड 1, चिखली शहर : 11, चिखली तालुका : वळती 2, भालगांव 1, अंचरवाडी 1, मलकापूर शहर : 2, मेहकर शहर : 30, मेहकर तालुका : घाटबोरी 2, चिं.बोरे 1, पांग्रा डोळे 3, दाभा 1, लोणी गवळी 3, शिवपूरी 1, उकळी 1, मादनी 2,लोणार शहर : 2, लेणार तालुका : कि. जट्टू 6, तांबोळा 1, मांडवा 1, बिबी 1, कुंबेफळ 1,खामगांव शहर : 77, खामगांव तालुका : गोंधनापूर 1, शेलोडी 1, घारोड 1, पिं. देशमुख 2, मुरंबा 2, उमरा 1, बोरी अडगाव 1, शहापूर 1, विहीगांव 3, गवंढळा 1, रामनगर 1, अटाळी 6, आंबेटाकळी 1, जळगांव जामोद तालुका : वडशिंगी 1,शेगांव शहर : 2, संग्रामपूर तालुका : वरवट बकाल 3, उकलगांव 1, वानखेड 4, दुर्गादैत्य 1,नांदुरा शहर : 8, नांदुरा तालुका : निमगांव 6, वडाळी 5, पि. धांडे 1,    अशाप्रकारे जिल्ह्यात 243 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 323 रूग्ण कोरोनामुक्त झााले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 771703 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 89150 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 89150 आहे.  आज रोजी 2140 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 771703 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 92154 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 89150 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 2325 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 679 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

                                                            ******

कर्जमुक्ती योजनेतंर्गत मयत कर्जदारांची माहिती बँकांनी अद्ययावत करावी

       बुलडाणा,(जिमाका) दि. 26 :  राज्यात  1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुल शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मयत कर्जदारांच्या बाबतीत सुधारीत अद्ययावत माहिती संगणकीय प्रणालीवर (पोर्टल) वर अपलोड करण्यासाठी 22 ऑक्टोंबर 2021 ते 8 नोव्हेंबर 2021 या कालावधीत योजनेच्या सेंट्रल टीम मार्फत बँकांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येऊन सदर सुविधेची कार्यपद्धती बँकांना ई-मेलद्वारे सेंट्रल टीमवरुन पाठविण्यात आली होती.

    तथापि याबाबत अद्याप बँकांच्या स्तरावर कार्यवाही प्रलंबित असल्याचे दिसून येते. सदर बाबत मयत कर्जदारांच्या बाबतीत सुधारीत अध्ययावत माहिती संगणकीय प्रणालीवर सादर करण्यासाठी अंतिम संधी म्हणून सदर सुविधा दि. 31 जानेवारी 2022 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यानंतर अशी सुविधा बँकांना उपलब्ध राहणार नाही व ज्या मयत कर्जदारांच्या बाबतीत सुधारीत अद्ययावत माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवर सादर न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी बँकेची राहील, याची नोंद घ्यावी. तसेच मयत कर्जदार सभासदाच्या वारसांनी संबंधीत बँकेशी संपर्क साधून वारसाचे कागदपत्रे संकेतस्थळावर सादर करावीत, असे आवाहन संगमेश्वर बदनाळे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.

शेतकरी प्रशिक्षण प्रक्षेत्र भेटीसाठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.27 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमातंर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात 31 जानेवारी पर्यंत अर्ज करावे. फलोत्पादन तसेच कृषि क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या संशोधन संस्था, भारतीय अनुसंधान परीषदे अंतर्गत संशोधन संस्था, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विद्यापीठ प्रक्षेत्र फलोत्पादन व प्रक्रिया क्षेत्रात काम करणारे यांच्या शेतावर 5 दिवशीय प्रक्षेत्र प्रशिक्षण दौऱ्यासाठी शासनाच्यावतीने अनुदानावर सहलीसाठी इच्छूक शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात 31 जानेवारी पर्यंत अर्ज करावे. प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत राबविलेल्या उपक्रमाची पाहणी करून शेती क्षेत्रात उत्पन्न वाढीच्या संधीचा अभ्यास शेतकऱ्यांना करता येणार आहे. फळबाग लागवड, कांदाचाळ, संरक्षीत शेती, काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया याबाबत लाभ घेतलेल्या तसेच लाभ घेवू इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी, मेहकर यांनी केले आहे.

अर्जदारासाठी अटी : प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे निवड करण्यात येईल, शेतकऱ्याच्या नावे 7/12 व नमुना 8 अ असावा, वयोमर्यादा 18 ते 45 असावी, आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स असावी, पासपोर्ट आकराचा एक फोटो असावा.

                                                                                ******

 

No comments:

Post a Comment