Sunday 23 January 2022

DIO BULDANA NEWS 23.1.2022

 जिल्हाधिकारी कार्यालयात 

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवाद
बुलडाणा, (जिमाका) दि. २३ : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, अधिक्षक शामला खोत यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
000

कोविड उपचार सुविधांची माहिती “मोबाइल अॅप'द्वारे मिळणार एका क्लिकवर
बुलडाणा, (जिमाका) दि. २३ : कोविडचे निदान झाल्यावर उपचार सुविधांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 'एमएचसीसीएमएस' (MHCCMS) अर्थात कोविड केअर) मॅनेजमेंट सिस्टीम या मोबाईल अॅप ची निर्मिती केली असून या मध्यमातुन नागरिकांनी माहिती घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिकआरोग्य विभागाने हे अॅप तयार केले असून www.mahacovid.jeevandayee.gov. in ही  अॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक आहे.
    या शिवाय गुगल प्ले स्टोअरवरही हे अॅप उपलब्ध आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यावर आपण आपला जिल्हा, तालुका आदी निवडल्यावर आपल्या भागातील उपलब्ध बेड संख्या, कोणत्या हॉस्पिटल मध्ये किती बेड उपलब्ध आहेत. त्यातही ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर सुविधा, अतिदक्षता विभाग, साधे बेड या प्रमाणे वर्गिकरण ऊपलब्ध आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची सुविधा उपलब्धता व अशी विविध प्रकारची माहिती यात उपलब्ध करण्यात आली आहे.या शिवाय अन्य जिल्ह्यातील माहितीही नागरिकांना पाहता येणार आहे. तसेच त्या त्या रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. सामान्य नागरिकांना ही माहिती पाहता येणार आहे. जेणेकरून त्यांना आपल्या घरातील रुग्णाच्या उपचाराबाबत मार्गदर्शन मिळेल. या शिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांना युजर आयडी व पासवर्ड द्वारे, औषधांची उपलब्धता, ऑक्सिजन उपलब्धता याबाबतची माहितीही जिल्हास्तरावरील नियोजनासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.  सर्व नागरिकांनी या अॅप चा वापर कोविड उपचार सुविधा माहितीसाठी करावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने  केले आहे.
*******
एफडीए ची चिखली एमआयडीसी मध्ये कारवाई
बुलडाणा, (जिमाका) दि. २३ : अन्न व औषध प्रशासन (म. राज्य), बुलडाणा अर्यालयाचे अन्न सुरक्षा  जी. के. वसाने यांनी प्रशासनाच्या गुप्त वार्ता शाषेस प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) स. ए.सूर्यवंशी यांचे समवेत मनिष सुरेश अग्रवाल यांच्या मालकीच्या मे. यश ट्रेडर्स, प्लॉट नं. ए ७, एम, आय डी. सी., चिखली येथे १२ जानेवारी रोजी फुटाना (भुना चना) उत्पादक आस्थापनेची तपासणी करण्यात आली. सदर आस्थापनेत हरभऱ्यावर प्रक्रिया करून त्यात हळद पावडर, आयोडीनयुक्त मीठ, व खाद्य रंगाचा वापर करून फुटाणा (भुना चना) चे उत्पादन होत असल्याचे आढळले. आस्थापनेची तपासणी करण्यात आली व हरभऱ्यांवर प्रक्रिया करून भुना चना उत्पादन करणाऱ्या आस्थापनेतुन भुना   चना व भुना चना उत्पादनासाठी आवश्यक घटक अन्न पदार्थाचे विश्लेषणासाठी नमुने घेण्यात आले आहेत.
   सदर उत्पादन प्रक्रियेत हा रंगाचा वापर करण्यात मेत असल्याचे आढळले. अन्न सुरक्षा च मानदे कायद्यान्वये Tatrazine Special या रंगाच्या अन्न पदार्थाच्या उत्पादनात वापरास परवानगी नाही. सदर आस्थापनेत भुना चना व भुना चना उत्पादनासाठी आवश्यक घटक अन्न पदार्थाचा ११ लक्ष २८ हजार २६७ रुपये किंमतीचा साठा भेसळयुक्त असल्याचे आढळल्याने जन आरोग्याच्या दृष्टीने जप्त करून अन्न व्यवसायिकाच्या ताब्यात सुरक्षित ठेवला आहे. सदर नमुने पृथः करणासाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. सदर नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशिर कारवाई करण्यात येईल. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन, चिखली येथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन चिखली करीत आहे, असे सहायक आयुक्त श्री. केदारे यांनी कळविले आहे.
*****

No comments:

Post a Comment