Tuesday 18 January 2022

DIO BULDANA NEWS 18.1.2022



 कोरोना अलर्ट : प्राप्त 1576 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 265 पॉझिटिव्ह

  • 25 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1841 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1576 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 265अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 104 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 161 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 242 तर रॅपिड टेस्टमधील 1334 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1576 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 63, बुलडाणा तालुका : अटकळ 2, सातगांव 2, म्हसला 1, चांडोळ 1, गोंधनखेड 1, पळसखेड नाईक 3, पाडळी 4, गिरडा 1,  हतेडी बु 8, अंबोडा 2, दहीद बु 1, सव 1, कोलवड 1,  तांदुळवाडी 1,   चिखली शहर :30, चिखली तालुका : दिवठाणा 2, पेठ 1, भालगांव 1, इसरूळ 1, भोरसा भोरसी 1, अंत्री खेडेकर 1, भडगांव 1, खैरव 1, मोताळा तालुका : कोऱ्हाळा 1, पि. देवी 2, लिहा 1, काबरखेड 1,राजूर 1,  कोल्ही गवळी 1, टाकळी 1, धोनखेड 1, मोताळा शहर : 5, जळगांव जामोद शहर : 3, जळगांव जामोद तालुका : सुलज 1, भेंडवळ 1, वाडी खु 1, मलकापूर शहर : 23, शेगांव शहर : 1, खामगांव शहर : 20, खामगांव तालुका : मांडका 1, दिवठाणा 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 7, दे. राजा शहर : 19, दे .राजा तालुका : दे. मही 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : बिबी 1, चिखला 3, किन्ही 1, नांदुरा शहर : 6, नांदुरा तालुका : वडाळी 1, वडनेर 2, फुली 1, शेंबा 3, टाकरखेड 5, कंडारी 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : जानेफळ 1, फर्दापूर 2, गोमेधर 1, सिं. राजा तालुका: दुसरबीड 1, आगेफळ 1, पिं. सोनारा 1, शेंदुर्जन 1, साखरखेर्डा 1, गोरेगाव 1, सिं. राजा शहर : 1,    परजिल्हा : शेलवड ता. बोदवड 1,  भोकरदन जि. जालना 1, तेल्हारा 2, देवास मध्यप्रदेश 1, अशाप्रकारे जिल्ह्यात 265 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 25 रूग्ण कोरोनामुक्त झााले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 762035 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 87194 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 87194 आहे.  आज रोजी 833 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 762035 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 89270 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 87194 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 1400 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 676 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

                                                                        *********

कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या वाढवा

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • कोविड संसर्ग नियंत्रण बैठक
  • लसीकरण गतीने पुर्ण करा

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे. या लाटेत संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी चाचण्या वाढविण्यात याव्यात. चाचण्यांच्या सुविधा वाढवून तातडीने चाचणीचे अहवाल मिळतील, अशी व्यवस्था करावी, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी सूचना देताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी सर्वश्री अभिजीत नाईक, अनिल माचेवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, सहा. जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आदी उपस्थित होते.

   जिल्ह्यातील सक्रीय रूग्ण व कोविड संसर्गीत रूण्गाांवर गांभीर्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, अशा रूग्णांना ऑक्सिजनची गरज असल्यास तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करावा. यंत्रणेने ऑक्सिजनचा साठा व पुरवठा, मागणी याबाबत अद्ययावत रहावे. ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची चाचणी घेवून तपासणी करावी. लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा. जिल्ह्यात 15 ते 18 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण वेगाने पूर्ण करावे. त्यासाठी लसींची अधिकची मात्रा ठेवण्यात यावी. तसेच दुसरा डोस आलेल्या नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता दुसरा डोस घ्यावा. रूग्णवाढ लक्षात घेता पर्याप्त औषधीसाठा ठेवावा. औषधांची कमतरता पडायला नको.

  ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे.  मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध पोलीस विभागाने कारवाई करून दिवसा जमावबंदी व  रात्री संचारबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करावी. ओमायक्रॉन या नविन व्हेरींएंटचे रूग्ण असल्यास त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घ्यावा. त्यांची तपासणी करून घ्यावी.

    सध्या 17 पीएसए प्लँट, 4 एलएमओ प्लँट व 45 ड्युरा सिलेंडर मधून 99.90 मे.टन ऑक्सिजनची तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात 15 ते 18 वर्ष वयोगटातील 49 हजार 615 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी आरोग्य यंत्रणेने दिली.  बैठकीला संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

                                                                                    **********

No comments:

Post a Comment