Thursday 13 January 2022

DIO BULDANA NEWS 13.1.2022

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 1633 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 188 पॉझिटिव्ह

  • 26 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 13 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1821 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1633 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 188 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 103 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 85 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 295 तर रॅपिड टेस्टमधील 1338 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1633 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 114, बुलडाणा तालुका : शिरपूर 1, सागवण 4, येळगांव 1, नांद्राकोळी 1, मोताळा तालुका : उबाळखेड 1, पिं. देवी 1, पोफळी 1, सिंदखेड 1,  मलकापूर शहर : 4, मलकापूर तालुका : माकनेर 1, कुंड 1, खामगांव शहर : 1, नांदुरा शहर : 7, नांदुरा तालुका : निमगांव 1,  चिखली शहर : 14, चिखली तालुका : अंत्री खेडेकर 1, बेराळा 1, भोरसी 1, टाकरखेड 1, चिंचखेड 1, दे. राजा शहर : 2, दे. राजा तालुका : टाकरखेड भा 1, लोणार शहर : 3, जळगांव जामोद तालुका : वाडी 2, पळशी वैद्य 1, मडाखेड 1, बोराळा खु 1,  मेहकर शहर : 3, शेगांव शहर : 15,       अशाप्रकारे जिल्ह्यात 188 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 26 रूग्ण कोरोनामुक्त झााले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 756733 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 87030 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 87030 आहे.  आज रोजी 974 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 756733 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 88204 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 87030 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 498 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 676 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

                                                                        *********

तूरीच्या शासकीय खरेदीला सुरूवात

  • 6300 रूपये प्रति क्विंटल हमी भाव
  • जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यता
  • शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.13 : हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडच्या वतीने शासकीय तूर खरेदी करण्यात येणार आहे. तूरीला 6 हजार 300 रूपये प्रति क्विंटल हमी भाव असून या भावाला तूरीची खरेदी होणार आहे. तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करणे सुरू असून तूर खरेदीसाठी जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.

   त्यामध्ये बुलडाणा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, दे. राजा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, लोणार तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, मेहकर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, शेगांव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, संग्रामपूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर केंद्र साखरखेर्डा ता. सिं. राजा आणि माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी दे. राजाचे सिं. राजा केंद्र, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली केंद्र उंद्री यांचा समावेश आहे. या खरेदी केंद्रांवर तूरीची 31 मार्च 2022 पर्यंत खरेदी होणार आहे. तूर हे आंतरपीक म्हणून घेण्यात येत असले तरी सध्या सुरू असलेल्या तूर खरेदीसाठी मूंग, उडीद व सोयाबीन आदी पिकासोबत आंतर पीक म्हणून घेतलेल्या तूरीच्या लागवडीखालील पूर्ण क्षेत्र व कापूस पिकासोबत तूरीचे आंतरपीक असल्यास कापूस व तूरीसाठी अर्धे-अर्धे अर्थात 50-50 टक्के क्षेत्र ग्राह्य धरून उत्पादकता निचित केलेली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यासाठी प्रति हेक्टरी 870 किलो तूर प्रमाणेच खरेदी करण्यात येणार आहे. तसेच उत्पादकतेच्या 25 टक्के तूर खरेदी होणार असल्याचे शासनाचे आदेश आहेत.  

 त्यासाठी शेतकरी नाव नोंदणी सुरू आहे. तरी इच्छूक शेतकऱ्यांनी संबंधीत खरेदी केंद्रांवर जावून तूर खरेदीकरीता नोंदणी करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांना एसएमएस येतील त्या शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केंद्रावर घेवून यावयाचा आहे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे यांनी केले आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

तूर नोंदणीकरीता शेतकऱ्यांना आधार कार्ड, सात बारा ऑनलाईन पिकपेरासह दाखला, बँक पासबुकची आधार लिंक केलेली छायांकित प्रत, मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

                                                            ********

   भरडधान्य खरेदी कालावधी 31 जानेवारीपर्यंत

  • मका, ज्वारी व बाजरीची आधारभूत किंमत जाहीर

बुलडाणा, (जिमाका) दि. 13: खरीप पणन हंगाम 2021-22 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत जिल्ह्यात भरडधान्य अर्थात मका, ज्वारी (संकरीत), ज्वारी (मालदांडी), बाजरी व रागी खरेदीस 31 जानेवारी 2022 पर्यंत मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी तालुकानिहाय भरड धान्य खरेदी करण्याकरीता अभिकर्ता संस्थेद्वारे एजन्सीना मंजूरी देण्यात आली आहे.  हमी दराने प्रति क्विंटल मका 1870 रूपये, ज्वारी संकरीत 2738 रूपये, ज्वारी मालदांडी 2758 रूपये, बाजरी 2250 रूपये व रागी 3377 रूपये प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे. सर्व तालुक्यातील गोदाम व्यवस्थापक अथवा गोदामपाल यांना याबाबत कार्यवाही करण्यासाठी सूचीत करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाने कळविले आहे.

                                                                        **********

                      दिव्यांग लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर मिनी पिठाची गिरणी मिळणार

  • जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

बुलडाणा, (जिमाका) दि. 13: जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे वतीने 5 टक्के दिव्यांग कल्याण योजनेतंर्गत सन 2021-22 या वर्षासाठी दिव्यांग लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर मिनी पिठाची गिरणी पुरविण्यात येणार आहे. या योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज अनुषंगिक सर्व कागदपत्रांसह संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयाकडे 24 जानेवारी 2022 पर्यंत सादर करावे. या योजनेचा जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सभापती सौ. पुनमताई विजय राठोड व जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

                                                                        *****

आयकरास पात्र असलेल्या निवृत्तीवेतन धारकांनी कागदपत्रे सादर करावीत

· 5 फेब्रुवारी 2022 अंतिम मुदत

· जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 13: राज्य शासनाकडून जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारक किंवा कुटूंब निवृत्ती वेतनधारक यांना वित्तीय वर्ष 2021-22 मध्ये आयकर भरण्यास पात्र असल्यास त्यांनी संबंधित कागदपत्रे सादर करावीत. त्यामध्ये बचतीचा तपशील, अपंग प्रमाणपत्र, पॅन कार्ड याव्यतिरिक्त आयकराचा भरणा केला असल्यास गणनापत्रक, चलान आदी संपूर्ण तपशील 5 फेब्रुवारी 2022 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावा. जेणेकरून आयकर भरण्यास पात्र असलेले निवृत्ती वेतन धारक अथवा कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांचे निवृत्ती वेतन आहरीत करून अदा करणे सोयीचे होईल. तसेच निवृत्ती वेतन अदा करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, याची नोंद घ्यावी. तरी आयकर भरणा करण्यास पात्र असलेल्या निवृत्तीवेतन धारकांनी कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी पं. शि. मांडोगडे यांनी केले आहे.

******

उन्हाळी हंगामासाठी भुईमुग बियाणे अनुदानावर उपलब्ध

  • इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करावी

बुलडाणा, (जिमाका) दि. 13: उन्हाळी 2021-22 हंगामासाठी राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसार अभियानातंर्गत बियाणे व लागवड साहित्य उपअभियान मध्ये भुईमुग बियाण्याकरीता ग्राम बिजोत्पादन अंतर्गत अनुदानावर भुईमूगाचे बियाणे उपलब्ध आहे. सदर बियाणेची विक्री महाबीज, अकोला मार्फत जिल्ह्यासाठी विक्रेते व उपविक्रेत्यांमार्फत सुरु होत आहे. सदरील योजनेमध्ये भुईमुग पिकामध्ये टॅग -24 या वाणाचे बियाणे उपलब्ध आहे.

   भुईमुग 20 किलो बॅग ची मूळ किंमत 3 हजार 300 रूपये व अनुदान 1 हजार 400 रूपये प्रती बॅग आहे. अनुदानित किंमत 1 हजार 900 रूपये प्रती बॅग आहे. जिल्ह्यासाठी भुईमुग पिकाचे 1 हजार क्विंटल बियाण्याचे लक्षांक कृषी आयुक्ता लयाकडून प्राप्त झालेले आहे. सदरील योजनेमध्ये उपलब्ध असलेल्या मात्रेमधून एका शेतकऱ्याला एक एकर क्षेत्राच्या मर्यादेत 40 किलो पर्यंत अनुदानावर सातबारा, आठ – अ व आधार कार्ड, जातीचा दाखला ची प्रत देऊन महाबीजच्या वितरकांकडून बियाणे खरेदी करता येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या प्रमाणे बियाणे उपलब्ध असेपर्यंत शेतकऱ्यांना अनुदानित दराने पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महाबीज विक्रेता व तालुका कृषि अधिकारी यांचेकडे इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरित नाव नोंदणी करावी. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक यांनी  केले आहे.

                                         जिल्ह्यातील महाबीज विक्रेत्यांची नावे

महाराष्ट्र बीज भंडार C/o ऋषिकेश कृषी केंद्र, बुलडाणा. भंडारी ट्रेडिंग कंपनी, मोताळा. खंडेलवाल कृषी एजेन्सी,चिखली. दीपा ऍग्रो सर्विसेस,चिखली. एस.कुमार एग्रो सर्विस सेंटर,चिखली. बि.एस.बुरड,मलकापूर. एन.सि.कोचर,मलकापूर. गजानन कृषी केंद्र,मलकापूर. भारत बीज भंडार,खामगाव. महाराष्ट्र बीज भंडार,खामगाव. जैन कृषी केंद्र,खामगाव. विदर्भ ऍग्रो सेंटर, शेगाव. बालाजी कृषी केंद्र,सोनाळा ता.संग्रामपूर. एन.सि.कोचर C/O खंडेलवाल ऍग्रो सेंटर,सोनाळा ता.संग्रामपूर. विदर्भ ऍग्रो सर्विस सेंटर,नांदुरा. सुपे ऍग्रो व मशिनरी सेंटर,नांदुरा.  एन.सि.कोचर C/O श्रीराम कृषी केंद्र,जळगाव जामोद. अजंठा ऍग्रो सर्विस सेंटर,मेहकर. गुरुकृपा सीड्स डोणगाव, ता.मेहकर. आचल कृषी केंद्र,लव्हाळा ता.मेहकर. शिवकृपा कृषी केंद्र जानेफळ ता. मेहकर. प्रगती कृषी केंद्र,लोणार. अजंठा ऍग्रो सर्विस सेंटर C/o आनंद ऍग्रो एजन्सी, शेंदुर्जन ता.सि.राजा. वि.सि.एम.एफ. C/o न्यु यशोधन कृषी केंद्र अंढेरा ता.दे.राजा.

                                                                        ****

                        चिखली येथील निराधार योजना समितीच्या सभेत 692 प्रकरणांना मंजूरी

बुलडाणा, (जिमाका) दि. 13: चिखली तहसिल कार्यालयात संजय गांधी निरधार अनुदान योजना समितीची सभा 12 जानेवारी 2022 रोजी अध्यक्ष समाधान सुपेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत महाऑनलाईन पोर्टलवर श्रावण बाळ सेवा योजना, संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा, अपंग निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत 31 ऑक्टोंबर 2021 पावेतो प्राप्त प्रकरणांची छाननी करून छाननी अंती पात्र प्रकरणांना मंजूरात देण्यात आली. यामध्ये श्रावण बाळ सेवा योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना अंतर्गत 560 व संजय गांधी निराधार योजना अंतर्गत 132 प्रकरणे असे एकूण 692 प्रकरणांना मंजूरी प्रदान करण्यात आली. सभेला तहसिलदार डॉ. अजीतकुमार येळे, संगोयोचे नायब तहसिलदार वैभव खाडे,  सदस्य शेख रफीक शेख बुरहान, रविंद्र किसनराव तोडकर, परमेश्वर सुखदेव साळवे, श्रीमती ज्योती प्रकाश चव्हाण, बाबुराव सखारा सोनुने, नामदेव सदार, निलेश किसनराव अंजनकर व चिखली नगर परिषद मुख्याधिकारी उपस्थित होते. यावेळी समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्या संदर्भात येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत तहसिलदार , चिखली यांच्यासोबत चर्चा केली, असे नायब तहसिलदार, चिखली यांनी कळविले आहे.

                                                                                                **********

No comments:

Post a Comment