Thursday 6 January 2022

DIO BULDANA NEWS 6.1.2022

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 432 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 23 पॉझिटिव्ह

  • 2 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 456 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 432 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 23 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 16 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 175 तर रॅपिड टेस्टमधील 257 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 432 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 3, जांभरून रोड 1, शिवशंकर नगर 1, चांडक ले आऊट 1, वृंदावन  नगर 1, डिसडी 2, रामनगर 1, संभाजी नगर 1,   खामगांव शहर : वाडी 1, दाल फैल 1, दिपाली नगर 1, मलकापूर शहर : 1, आनंद सोसायटी 1, गजानन नगर 3, शेगांव शहर : 1, मेहकर शहर : 1, मोताळा तालुका : सावरगांव 1, दे. राजा शहर : 1  अशाप्रकारे जिल्ह्यात 23 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 2 रूग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.  

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 749823 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86991 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86991 आहे.  आज रोजी 494 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 749823 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87721 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86991 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 54 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 676 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                                                    **********


जिल्हा माहिती कार्यालयात दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

      बुलडाणा, (जिमाका) दि.6 : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला आज जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन करून दर्पण दिन साजरा करण्यात आला. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले दर्पण नावाचे नियतकालीक सुरू केले.  त्यानिमित्ताने दर्पण दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो.

 यावेळी जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, माहिती सहायक निलेश तायडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष लहाने, पृथ्वीराज चव्हाण, भानुदास लकडे, शौकत शाह यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हा माहिती कार्यालयातील प्रेमनाथ जाधव, सौरभ बढीये,  प्रमोद राठोड, राम पाटील आदी उपस्थित होते.

                                                                                                                ***********

आयकरास पात्र असलेल्या निवृत्तीवेतन धारकांनी कागदपत्रे सादर करावीत

· 5 फेब्रुवारी 2022 अंतिम मुदत

· जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : राज्य शासनाकडून जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारक किंवा कुटूंब निवृत्ती वेतनधारक यांना वित्तीय वर्ष 2021-22 मध्ये आयकर भरण्यास पात्र असल्यास त्यांनी संबंधित कागदपत्रे सादर करावीत. त्यामध्ये बचतीचा तपशील, अपंग प्रमाणपत्र, पॅन कार्ड याव्यतिरिक्त आयकराचा भरणा केला असल्यास गणनापत्रक, चलान आदी संपूर्ण तपशील 5 फेब्रुवारी 2022 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावा. जेणेकरून आयकर भरण्यास पात्र असलेले निवृत्ती वेतन धारक अथवा कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांचे निवृत्ती वेतन आहरीत करून अदा करणे सोयीचे होईल. तसेच निवृत्ती वेतन अदा करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, याची नोंद घ्यावी. तरी आयकर भरणा करण्यास पात्र असलेल्या निवृत्तीवेतन धारकांनी कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्री. मांडोगडे यांनी केले आहे.

                                                                                                *******

जिजाऊ व संत चोखामेळा जन्मोत्सव 50 व्यक्तींच्या उपस्थितीत साजरा करण्यास परवानगी

  • उपस्थित नागरिकांनी लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे

बुलडाणा,(जिमाका) दि. 6 : कोविड 19 या आजाराचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सर्व सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 50 व्यक्तींपुरती मर्यादीत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात 12 जानेवारी 2022 रोजी साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव व 14 जानेवारी रोजी असणारा संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळ्याला साध्या पद्धतीने 50 व्यक्तींच्या उपस्थितीत साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. जिजाऊ जन्मोत्सवामध्ये 12 जानेवारी 2022 रोजी राजे लखुजीराव जाधव राजवाडा येथील महापुजा, जिजाऊ सृष्टी येथे शिवधर्म ध्वजारोहण, जिजाऊ सृष्टी येथे शाहीरांचे पोवाडे, मुख्य जन्मोत्सव सोहळा, समारोपीय कार्यक्रम तसेच 14 जोनवारी 2022 रोजी संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळ्यातील कार्यक्रम 50 व्यक्तींच्या उपस्थितीत घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  सदर सोहळ्याकरीता उपस्थितांना मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे. कार्यक्रम स्थळी येणाऱ्या व्यक्तींची 48 तासापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह अहवाल प्रमाणपत्र सोबत असावेत. जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित व्यक्तींना आयोजन समितीकडून ओळखपत्र देण्यात यावे. जन्मोत्सव दरम्यान होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र हे स्वतंत्र असावेत. ओळखपत्राशिवाय कोणत्याही कार्यक्रम स्थळी प्रवेश देऊ नये. जिजाऊ जन्मोत्सव दरम्यान सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी. जिजाऊ जन्मोत्सवासाठी व्यक्ती, आयोजक, निमंत्रीत, सदस्य, सहाय्यक सेवेकरी, खाजगी सुरक्षा रक्षक व बंदोबस्तावरील लोक यांच्यासह कोणत्याही परिस्थितीत गर्दी, जमाव संख्या 50 पेक्षा जास्त होणार नाही याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. कार्यक्रमासाठी उपस्थित व्यक्तींनी कोविड 19 प्रतिबंधात्मक 2 लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे. या उत्सवादरम्यान कोरोना या विषाणूच्या प्रसारावर प्रतिबंध घालण्यासाठी गर्दी न करणे, सोशल डिसटसिंगचे पालन करणे, मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड करणे याबाबतची कारवाई नगर पालिका व पोलीस विभाग करणार आहेत, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                                ************

 

No comments:

Post a Comment