Wednesday 19 January 2022

DIO BULDANA NEWS 19.1.2022

 

                              कोरोना अलर्ट : प्राप्त 1711 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 375 पॉझिटिव्ह

  • 97 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2086 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1711 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 375 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 258 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 117 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 385 तर रॅपिड टेस्टमधील 1326 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1711 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली तालुका : सवणा 1, बेराळा 1, पिंपळगांव 1, गांगलगाव 1, खैरव 1, भोकर 1, मालखेड 1, किन्होळा 1, किन्ही सवडत 1, उंद्री 2, शेलूद 1, चिखली शहर : 19, बुलडाणा शहर : 106, बुलडाणा तालुका : डोंगरखंडाळा 1, येळगांव 3, कोलवड 2, अंबोडा 1,  दहीद 1, पांगरी 1, सातगाव 1, धाड 1, चौथा 1, पाडळी 2,   खामगांव शहर : 25, खामगांव तालुका : निपाणा 1, जनुना 1, सुटाळा 2, हिवरखेड 1, वर्णा 1, पिं. राजा 1, कुंबेफळ 3,  मलकापूर शहर : 19, मलकापूर तालुका : पिंपळखुटा 1, दाताळा 1, भाडगणी 1, लासुरा 1, दे. राजा तालुका : असोला 1, नागणगांव 1, दे. राजा शहर : 6, सिं. राजा तालुका : दुसरबीड 1, सवडत 1, साखरखेर्डा 1, काटोडा 1, वर्दडी 1,  लोणार तालुका : बिबी 1, खापरखेडा 1, नांदुरा शहर : 34, नांदुरा तालुका : येरळी 1, भोरवंड 1, माटोडा 1, पिं. अढाव 1, शेंबा 2, तांदुळवाडी 2, गोसिंग 1, वडाळी 1, जळगांव जामोद तालुका : सुलज 3, आसलगांव 2, पेसोडा 1, येनगांव 2,  मांडवा 9, पिं. काळे 3, वाडी 4, जळगांव जामोद शहर : 19, शेगांव शहर : 22, शेगांव तालुका : वरखेड 1, जलंब 1, चिंचोली 1, गव्हाण 1, लासुरा 1, माटरगांव 1, कालखेड 1, टाकळी विरो 1, मेहकर शहर : 15, मेहकर तालुका : मुंदेफळ 1, जानेफळ 4, मोताळा तालुका : खरबडी 1, अंत्री 1, बोराखेडी 2, कोथळी 1, शेलापूर 1, घाणेगांव 2, काबरखेड 2, धा. बढे 1, सिंदखेड 1, लिहा 1, मोताळा शहर : 2, अशाप्रकारे जिल्ह्यात 375 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 97 रूग्ण कोरोनामुक्त झााले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान निपाणा ता. खामगांव येथील 3 महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 763746 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 87291 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 87291 आहे.  आज रोजी 633 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 763746 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 89645 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 87291 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 1677 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 677 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

                                                                        *********


0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलीओ डोस पाजावा

- जिल्हाधिकारी

• 2 लक्ष 58 हजार 289 अपेक्षीत बालके

• 2118 बुथची व्यवस्था, 126 मोबाईल टिम सज्ज

• 27 फेब्रुवारी रोजी पोलीओ लसीकरण मोहिम

• बालकाच्या डाव्या हाताच्या करंगळीवर मार्कर पेनची खून करण्यात येणार

बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत 27 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना या दिवशी पोलीओ डोस पाजण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज केले.

राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बेालत होते. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. खिरोडकर, डॉ. यास्मीन चौधरी आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

   पोलीस लसीकरण मोहिम 27 फेब्रुवारी 2022 रोजी राबविण्यात येत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, कोविड साथरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन लसीकरण स्थळी करावे. एकाचवेळी 5 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना एकत्र येवू देवू नये. तसेच मास्कचा वापर बंधनकारक करावा. लसीकरणासाठी जिल्ह्यात 2118 पोलीओ बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 126 मोबाईल टिम, 2 रात्रीच्या टिम सज्ज करण्यात आल्या आहे. या संपूर्ण मोहिमेसाठी 5 हजार 614 मनुष्‍बळ कर्तव्य बजाविणार आहे. जिल्ह्यातील सर्व गावे, वाड्या, वस्ती, तांडे, विटभट्टी, मेंढपाळ, आदिवासी कुठल्याही स्तरावरील बालक वंचित राहणार नसल्याची काळजी घेण्यात यावी. लसीकरण झालेल्या सर्व बालकांच्या डाव्या करंगळीवर मार्कर पेनने खुण करण्यात येणार असून यासाठी मोबाईल पथक, ट्रन्झिट टीम आदी सज्ज ठेवण्यात येत आहे. जेणेकरून कुणीही बालक पोलीओ डोसपासून वंचित राहणार नाही.

   जिल्ह्यात ग्रामीण भागात 1 लक्ष 94 हजार 888 बालके असून शहरी भागात 63 हजार 401 बालके आहे. अशाप्रकारे एकूण 2 लक्ष 58 हजार 289 बालके अपेक्षीत आहे. सर्व बालकांना लसीकरणाकरिता 2118 बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यात आरोग्य विभागासोबत विविध विभागातून एकूण 5614 कर्मचारी सहकार्य करणार आहे. त्यासाठी 428 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोहिमेसाठी 3 लक्ष 25 हजार व्हॅक्सीन डोसेसजी व्यवस्थाही करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.  

******

गरीमा रियल इस्टेट व गरीमा होम्स अँण्ड फार्म हाऊसेस कंपनीकडून फसवणूक

· आजपावेतो 4269 ठेवीदारांची 8 कोटी 60 लक्ष रूपयांनी फसवणूक

· या कंपनीच्या नावाने फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : गरीमा रियल इस्टेट अँण्ड अलाईड मिलीटेड व गरीमा होम्स अँण्ड फार्म हाऊसेस लिमीटेड कंपनीने स्वत:चे कार्यालय डिएसडी आसमंत बिल्डींग, चिखली रोड, बुलडाणा येथे उघडले. कंपनीने गुंतवणूकदारांना आश्वासनाप्रमाणे केलेल्या गुंतवणूकीचा परतावा न देता कंपनीचे कार्यालय बंद केले. याबाबत अरूण लक्ष्मण फोलाणे (वय 43) रा. रायपूर यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्यादीनुसार बनवारीलाल माधवसिंह कुशवाह रा. जमालपूर, शिवराम माधवसिंह कुशवाह, बालकिसन माधवसिंह कुशवाह व जितेंद्रकुमार पुरासिंह रा. राजस्थान यांनी या कंपनीचे कार्यालय उघडून कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वारंवार आमिष दाखविले. कंपनीने फिर्यादीकडून 11 लक्ष 30 हजार 982 रूपयांची गुंतवणूक करवून घेतली. मात्र आश्वासनाप्रमाणे परतावा न देता कार्यालय बंद करून त्यांची व सहकार्यांची आर्थिक फसवणूक केली. या रिपोर्टवरून बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला कलम 420, 406 व 34 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आजपावेतो झाालेल्या तपासावरून व उपलब्ध कागदपत्रांवरून गरीमा रियल इस्टेट अँण्ड अलाईड मिलीटेड व गरीमा होम्स अँण्ड फार्म हाऊसेस लिमीटेड, साथी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी या कंपन्यांनी एकूण 4269 ठेवीदारांची 8 कोटी 60 लक्ष 87 हजार 433 रूपयांचा अपहार करून फसवणूक  केली.

    या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे व पेालीस उपअधिक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत करीत आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी कंपनीचे संचालक बालकिसन माधवसिंह कुशवाह वय 32 रा. जमालपूर जि. धौलपूर राजस्थान यास 18 जानेवारी 2022 रोजी अटक केली आहे. याप्रकरणी मा. न्यायालयातून 21 जानेवारी 2022 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला असून पुढील तपास पो. उप दिगंबर अंभोरे, पोहेकॉ सरदार बेग, अविनाश जाधव, संजय कोल्हे, रामेश्वर मुंढे, राजेंद्र मोरे, संजय शेळके, पोका दिपक जाधव, एजाज खान, जितेंद्र झाडोकार, मपोका किरण भुजबळ, विद्या आराख करीत आहे.

   गरीमा रियल इस्टेट अँण्ड अलाईड मिलीटेड, गरीमा होम्स अँण्ड फार्म हाऊसेस लिमीटेड व साथी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या नावाने अशाप्रकारचे आमिष दाखवून कुणाची आर्थिक फसवणूक झालेली असल्यास अशा व्यक्तींनी त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या या कंपन्यांच्या कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक दिगंबर अंभोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                                                ******

 

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे

  • 30 जानेवारी 2022 अंतिम मुदत

बुलडाणा,(जिमाका) दि. 19 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाद्वारे समाजात महिला सशक्तीकरण, समाज व राष्ट्र निर्माण करण्याचे कामात उत्कृष्ट योगदान देणारी व्यक्ती , संस्था यांना दरवर्षी नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येते. या पुरस्काराकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

  या पुरस्कासाठी दि. 1 जुलै 2021 रोजी ज्या व्यक्तींचे वय किमान 25 वर्ष पुर्ण केलेले आहे आणि ज्यांना यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार, स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही. तसेच ज्या संस्था, गट, संघटना यांनी किमान 5 वर्षे संबंधीत क्षेत्रात काम केलेले आहे आणि ज्यांना यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार , स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, असे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत.

  कौशल्य विकासासाठी महिलांना प्रोत्साहित करणे, ग्रामीण महिलांसाठी मुलभुत सुविधा सुकर करणे, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रिडा, कला, संस्कृती आदी क्षेत्रांमध्ये ठोसपणे व सार्थपणे बचाव व सुरक्षा, आरोय, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य महिला सक्षमीकरणाचा व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना यांना अनुभव असावा. राज्य अथवा केंद्रशासी प्रदेशात बाल लैंगिक गुणोत्तर अचुकपणे सुधारणा करण्याचे काम करणाऱ्यांचा या पुरस्कारासाठी प्रथम प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.

   अर्जदाराने नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज, नामनिर्देशन केवळ ऑनलाईनव्दारे केंद्र शासनाचे www.awards.gov.in  या वेबसाईटवर भरायचे आहेत. ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या कागदपत्रांसह नामांकने सादर करावे. नामांकने सादर करावयाची अंतिम तारीख ही 31 जानेवारी 2022 आहे. नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र इच्छुक व्यक्ती किंवा संस्था / गट / संघटना यांना उपरोक्त वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी केले आहे.

                                                                 ***********

स्वामी विवेकानंद जयंती महोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार

  • कार्यक्रमांना 20 व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी
  • मिरवणूक, शोभायात्रा व महाप्रसादास परवानगी नाही

बुलडाणा,(जिमाका) दि. 19 : विवेकानंद नगर ता. मेहकर येथे स्वामी विवेकानंद जयंती महोत्सव 23 ते 25 जानेवारी 2022 दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाकरीता कोविड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने 20 व्यक्तींच्या उपस्थितीत साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोविड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सर्व सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम, अन्य मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करण्यास परवानगी देण्यात येत आहे. कोविड 19 साथरोगाची लाट पुन्हा उफाळून गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी टाळण्याच्या दृष्टीने विवेकानंद जयंती महोत्सवातील कार्यक्रमांसाठी 20 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. मात्र महोत्सवादरम्यान शोभायात्रा, मिरवणूक व महाप्रसादास पारवानगी नसणार आहे.

    सदर सोहळ्याकरीता 23 जानेवारी रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेदरम्यान आयोजित कार्यक्रम, 24 जानेवारी रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेदरम्यान आयोजित कार्यक्रम व 25 जानेवारी रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेदरम्यान आयोतिज कार्यक्रमांना उपस्थित असलेल्या व्यक्तींना मास्क वापरणे बंधनकारक राहणार असून थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी करणे अनिवार्य आहे. कार्यक्रमात उपस्थित व्यक्तींनी आरोग्य सेतू डाऊनलोड करावे.सर्व सहभागी व्यक्तींचे कोरानेा लसीचे दोन्ही डोस झालेले असावे. दुसरा डोस घेवून 14 दिवस झालेले असावे. सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी. सर्व कार्यक्रम हे व्यासपीठावरील 20 व्यक्तींच्या उपस्थितीत व ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.

                                                                                                ********

 

No comments:

Post a Comment