Wednesday 12 January 2022

DIO BULDANA NEWS 12.1.2022

 


राजमाता जिजाऊ यांना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले अभिवादन

          बुलडाणा, (जिमाका) दि. 12 :राजमाता जिजाऊ यांचा आज 424 वा जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजना कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करीत सध्या पद्धतीने करण्यात आले. सदर जन्मोत्सव सोहळा सिंदखेडराजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यातील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मठिकाणी आयोजित करण्यात आले. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी जिजाऊ यांच्या पुतळ्याचं पूजन करून अभिवादन केले.  यावेळी  जिजाऊ वंदनेचे गायन करण्यात आले. राजमाता जिजाऊना अभिवादन करण्यासाठी काही युवक राजे छत्रपत्री शिवाजी महाराजाच्या वेशभुषेत,  तर युवती, महीला जिजाऊ यांच्या वेशभूषेत आल्या होत्या. यावेळी  नगराध्यक्ष सतिष तायडे,माजी नगराध्यक्ष ॲड नाझेर काझी, उपनगराध्यक्ष रूख्मीणीबाई तायडे, उपविभागीय अधिकारी भुषण अहीरे, तहसिलदार सुनील सावंत, मुख्याधिकारी प्रशांत भटकर  आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले.

 

                                                                                    ************

जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

     बुलडाणा,(जिमाका) दि. 12 : जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी प्र. जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

*""******

             


सिं.राजा कृषि उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी भवनचे भूमिपुजन

          बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : सिंदखेड राजा येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पिकेल ते विकेल या अभियानातंर्गत शेतकरी भवनचे भूमिपुजन आज 12 जानेवारी रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते कुदळ मारून करण्यात आले. तसेच याप्रसंगी नामफलकाची फितही कापण्यात आली. यावेळी जि. प सदस्य रामभाऊ जाधव, माजी नगराध्यक्ष ॲड नाझेर काझी, पं.स सभापती मिनाताई बंगाळे,  बाजार समितीचे मुख्य प्रशासक सतीष तुपकर आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

                                                                                                ********

  जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्री व साठवणूक करण्यावर कायमस्वरूपी बंदी

बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर करून बनविण्यात आलेल्या व सर्वसाधारण नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याची निर्मिती,  विक्री व साठवणूक करण्यावर संपूर्ण जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.

मकर संक्रांत या सणाच्या अनुषंगाने पतंग उडवितात. मात्र या पतंगाला नायलॉन मांजा वापरल्यामुळे पक्षी व मानव जीवितास इजा पोहचविले जाते. तसेच दोन पतंगामध्ये दोऱ्याचे घर्षण होवून मोठ्या प्रमाणात मांजा तुटून उंच झाडे व इमारतीमध्ये मांजा अडकतो. त्यामुळे वनपक्षी यांचे जिवीतास धोका निर्माण होवून पशु- पक्षी जखमी अथवा मृत होतात. पतंगासह तुटलेल्या नायलॉन मांजाच्या धाग्यांचे तुकडे जमिनीवर पडून त्याचे विघटन होण्यासारखे नसल्याने गटारे व नदी – नाल्यांसारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात. तसेच गाय अथवा तत्सम प्राण्यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ठ असलेले खाद्य सेवन केल्यामुळे त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो. अशा प्रकारे मांजा अथवा धाग्यांमधील प्लास्टीकच्या वस्तुंमूळे विविध प्रकारचे दुष्परीणाम होत असतात.

   त्यामुळे जिल्ह्यात पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 चे कलम 5 अन्वये सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, साठवणूक करणारे यांना नायलॉन मांजा विक्री व साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था यांनी उल्लंघन केल्यास सदर बाब ही पर्यावरण अधिनियम अंतर्गत शिक्षेस पात्र असणार आहे, असे प्र जिल्हा दंडाधिकारी धनजंय गोगटे यांनी कळविले आहे.

*"""*******

राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताहाचे उद्घाटन

           बुलडाणा, (जिमाका) दि. 12 :  स्वामी विवेकांनद यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून संपुर्ण राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने आज 12 जानेवारी 2022 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी स्वामी विवेकानंद व राजमामाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करुन हारार्पण केले. तसेच प्रास्ताविकात युवांमध्ये व्यक्तिमत्व व नेतृत्व गुण विकसित करणे तसेच राष्ट्र उभारणीमध्ये युवांची महत्वपुर्ण भुमिका असल्यानेसामाजिक उपक्रम आयोजननियोजनामध्ये युवांचा सहभाग वाढविण्याची संधी युवा सप्ताहाच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगितले.  यावेळी राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून युवांबाबत उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या युवा पुरस्कारार्थी नितेश थिगळेगणेश भोसलेप्रभाकर वाघमारेश्री.काकडे यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेहस्ते सत्कार करण्यात आला. संचालन राज्‍य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे  यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती मनिषा ढोके यांनी केले.

            युवा दिन युवा सप्ताहाच्या निमित्ताने 12 ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत राष्ट्रीय युवा पुरुषांचे तत्वज्ञान व शिकवण यावर भाषणेवादविवाद स्पर्धाचित्रकला स्पर्धानिबंध स्पर्धारोजगार स्वयंरोजगार इत्यादीबाबत मार्गदर्शन इ. कार्यक्रमाचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये करुन त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

            सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवारअनिल इंगळेश्रीमती मनिषा ढोकेविजय बोदडेसुरेशचंद्र मोरे, कैलास डुडवाभिमराव पवारकृष्णा नरोटे आदींनी प्रयत्न केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                ********

पेनटाकळी प्रकल्पाच्या साकळी क्रमांक 0 ते 11 कि.मी कालव्याची

दुरूस्ती बांधकाम विभागामार्फत होणार

बुलडाणा, (जिमाका) दि. 12 :  पेनटाकळी प्रकल्पाचे हस्तांतरण हे शासन निर्णयानुसार झालेले नाही. सद्यस्थितीत पेनटाकळी प्रकल्प हा बांधकामाधीन असून या प्रकल्पाचे साकळी क्रमांक 0 ते 11 किलोमीटर दरम्यान कालव्याद्वारे सिंनासाठी पाणी सोडले असता पाझरामुळे सुमारे 400 हेक्टर जमिनीचे नुकसान होते. त्यामुळे साकळी क्रमांक 0 ते 11 कि.मी मधील लाभधारक शेतकऱ्यांनी कालव्याद्वारे सिंचनाकरीता पाणी न सोडण्याचे निवेदन यापूर्वी दिलेले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांचे दालनात अधिक्षक अभियंता, बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, बुलडाणा, कार्यकारी अभियंता, खडकपूर्णा प्रकल्प विभाग, दे. राजा यांचे समवते चर्चा झाली. त्यानुसार साकळी क्रमांक 0 ते 11 कि.मी वरील  दुरूस्तीसाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना बांधकाम विभागामार्फत तात्काळ करून देण्याचे ठरले आहे, असे उपविभागीय अभियंता, पेनटाकळी प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग, मेहकर यांनी प्रसिद्धी पत्रान्वये कळविले आहे.                                                                                                                   

  ************

जिल्ह्यात 14 ते 28 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडाचे आयोजन

 बुलडाणा, (जिमाका) दि. 12 :  शासन परिपत्रकानुसार 14 ते 28 जानेवारी 2022 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या कोविड 19 या संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावामुळे या पंधरवड्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे मोबाईल ॲपद्वारे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचेकडून नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झूम मिटींगद्वारे ऑनलाईन कार्यक्रमांचे नियोजनही करण्यात आले आहे. त्यानुसार झूम मिटींग ॲपवर 14 जानेवारी रोजी दु 12 ते 1 दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत डॉ. विकास बाहेकर यांचे मराठीचा मानदंड ग्रंथराज ज्ञानेश्वरी विषयावर प्रास्ताविक, 15 जानेवारी रोजी दु 12 ते 1 दरम्यान मराठी भाषेच्या संवर्धनाचे स्वरूप विषयावर डॉ. एस. एम कानडजे,  17 जानेवारी रोजी दु 12 ते 1 दरम्यान मराठी भाषा संवर्धन काळाची गरज विषयावर गजेंद्रसिंह राजपूत, 18 जानेवारी रोजी दु 12 ते 1 दरम्यान मराठी बोली भाषा, साहीत्य, आदिवासी साहित्य विषयावर प्रा. डॉ. गोविंद गायकी, 19 जानेवारी रोजी दु 12 ते 1 दरम्यान मराठी संताचे कार्य या विषयावर डॉ. अनंतराव शिरसाट, 20 जानेवारी रोजी दु 12 ते 1 दरम्यान मुलांमध्ये मराठी भाषेचे संवर्धन कसे करावे या  विषयावर डॉ. साधना भवटे, 21 जानेवारी रोजी दु 12 ते 1 दरम्यान मराठीच्या वाटचालीत वऱ्हाडीचे योगदान विषयावर अरविंद शिंगाडे, 24 जानेवारी रोजी दु 12 ते 1 दरम्यान डॉ सदानंद देशमुख यांचे काव्यवाचन, 25 जानेवारी रोजी दु 12 ते 1 दरम्यान मराठी भाषा आणि संस्कृती विषयावर डॉ. सिद्धेश्वर नवलाखे, 26 जानेवारी रोजी दु 12 ते 12.30 दरम्यान मराठी भाषेतील वाङमय प्रकार व प्रवाह या विषयावर डॉ. कि. वा वाघ, दु 12.30 ते 1 दरम्यान बदलती कविता विषयावर डॉ. संगीता पवार, 27 जानेवारी रोजी दु 12 ते 1 दरम्यान  संताजी कामगिरी या विषयावर श्री. पठाण, 28 जानेवारी रोजी दु 12 ते 1 दरम्यान गोष्टींचा वाटा अथवा कथकथन विषयावर डॉ. वैशाली निकम मार्गदर्शन करणार आहे.

    तसेच शिक्षण विभागामार्फत 16 जानेवारी रोजी मराठी भाषेचे महत्व विषयावर इयत्ता 5 ते 8,मराठी साहित्यातील संतांचे योगदान विषयावर इयत्ता 9 ते 12  व मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन विषयावर खुल्या गटासाठी निबंध स्पर्धा होणार आहे.  तसेच 22 जानेवारी रोजी मराठी भाषा चारोळी इयत्ता 5 ते 8, मराठी भाषा लेखन इयत्त 9 ते 12, कविता लेखन मराठी भाषा खुल्या गटासाठी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. तसेच 23 जानेवारी रोजी मराठी भाषा 20 ओळी हस्ताक्षर स्पर्धा इयत्ता 5 ते 8 मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचे आयोजन 14 ते 28 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी येथून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची लिंक https://us05web.zoom.us/j/8598057698?pwd=dXNaUlJpNU9qTHJFY2lVWTJGUWpmZz09 असून सर्व नागरिकांनी सदर लिंकचा वापर करून ऑनलाईन झुम बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment