Tuesday 11 January 2022

DIO BULDANA NEWS 11.1.2022

 

                            कै.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पधेचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि‍. 11 : भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शखेच्यावतीने सन 2021-2022 करीता कै.श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पधेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मुंबई येथील भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखेकडून दरवर्षी आयोजित करण्यात येते. त्यानुसार सन 2021-2022 या वर्षासाठीसुद्धा आयोजित करण्यता आली आहे. या निबंध स्पर्धेसाठी मिशन कर्मयोगी  लोक सेवा वितरणासाठीची क्षमता वाढवणे आणि भारत सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण हे विषय निवडण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी चार पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. प्रथम पारितोषिक रुपये 7500, व्दितीय पारितोषिक रुपये 6000, तृतीय पारितोषिक 3500 व उत्तेजनार्थ पारिातोषिक रुपये 2000 असे आहेत.

 निबंध हा वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून सादर करावा. तसेच तो 3000 शब्दांपेक्षा कमी आणि 5000 शब्दांपेक्षा जास्त नसावा. सदर निबंध हा विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक, संशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. निबंध कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करुन त्यावर केवळ टोपण नांव लिहून चार प्रतीत सादर करावा. स्पर्धेकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करु नये. निबंधाच्या प्रती व त्या सोबत वेगळया लिफाफ्यात स्पर्धकाचे नाव (मराठी व इंग्रजीतून) टोपनांव, पत्ता, संपर्क क्रमांक व ई-मेल ॲड्रेस नमूद करुन निबंधासोबत पाठवावे.

संस्थेच्यावतीने यापुर्वी घेतलेल्या स्पर्धेत पारितोषिक विजेता ठरलेला किंवा उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त स्पर्धक हा लगतची तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरणार नाही. टोपणनांव लिहलेल्या स्पर्धकाचे संपूर्ण नांव (इंग्रजी व मराठी) टोपणनाव, पत्ता व संपर्क क्रमांक व ई मेल ॲड्रेस लिहिलेली माहिती एकत्रीत एका मोठया लिफाफ्यामध्ये बंद करुन त्यावर कै.श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा 2019-2020 असे नमुद करावे.  तो मानद सचिव,भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, तळ मजला, बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, मुंबई 400 032 या पत्यावर दिनांक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पाठवावा.

स्पर्धकाच्या काही शंका असल्यास, माहितीसाठी कृपया दूरध्वनी क्रमांक (022)22793430 किंवा                      ई -मेल: js.mrb-iipa@gov.in व्दारे संपर्क साधावा, असे आवाहन भारतीय लोक प्रशासन संस्था यांच्यावतीने करण्यात आले आहे.

*****

कोरोना अलर्ट : प्राप्त 823 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 52 पॉझिटिव्ह

*3 रुग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 11 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 875 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 823 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 52 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 25 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 27 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 150 तर रॅपिड टेस्टमधील 673 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 823 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :31, दे. राजा शहर :1, दे. राजा तालुका : गिरोली बु 1, अंढेरा 1, मलकापूर शहर : 4, लोणार तालुका : पिंपळनेर 2, लोणार शहर :1, जळगाव जामोद तालुका : वाडी खू 1, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, मेहकर तालुका : डोनगाव 1, चिखली शहर :4, चिखली तालुका : हातनी 1, खामगाव शहर :2, संग्रामपूर तालुका : दुर्गदैत्य 1,  अशाप्रकारे जिल्ह्यात 52 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचार अंती 3 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 754090 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 87004 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 87004 आहे.  आज रोजी 966 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 754090 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87911 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 87004 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 231 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 676 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                                                    ****


उत्कृष्ट कामगिरी करणारे सैनिक व पाल्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार

बुलडाणा, (जिमाका) दि. 11 : जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सैनिक व त्यांचे पाल्य यांच्या सत्काराचे आज 11 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सैनिकांचा सत्कार केला.

   यावेळी बारामुलामध्ये वाहन तपासणीवेळी दोन आतंकवाद्यांचा खात्मा करणारे सीआरपीएफचे काँन्स्टेबल ज्ञानेश्वर श्रीराम साबळे, कम्बाइंड डिफेन्स सर्विसेस परीक्षेमध्ये देशातून प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल चि. अपूर्व गजानन पडघान आणि संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये देशातून 187 वा क्रमांक पटकाविल्याबद्दल पांडुरग ज्ञानोबा चाटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहा. जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. पडघान आदी उपस्थित होते.  

                                                            ********

प्रतिक्षाधीन निवड लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावी

  • पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी
  • 16 जानेवारी अंतिम मुदत

बुलडाणा, (जिमाका) दि. 11 : पशुसंवर्धन विभागातंर्गत राज्य व जिल्हास्तरीय योजनांमध्ये विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी प्रतिक्षाधीन लाभार्थ्यांची निवड करण्याची सुविधा आहे. त्यानुसार सन 2021-22 करीता नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेतंर्गत दुधाळ गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्ष्याच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिल्लांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी प्रतीक्षाधीन निवड करण्यात आली आहे. अशा प्रतीक्षाधीन यादीमधील लाभार्थ्यांनी अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे संकेतस्थळावर 12 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी प्रतीक्षाधीन निवड असलेल्या लाभार्थ्यांनी  सर्व योजनांचा लाभ मिळण्याकरीता अर्जासोबतची सर्व आवश्यक कागदपत्रे ah.mahadms.com या संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर यांनी केले आहे.

                                                            ******

--

No comments:

Post a Comment