लागवडीखालील पोटखराब जमिनीची नोंद ॲग्रिस्टॅक योजनेत होणार !

 

लागवडीखालील पोटखराब जमिनीची नोंद ॲग्रिस्टॅक योजनेत होणार !

कोणतीही बाधा नाही ; शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करुन घ्यावा

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

बुलढाणा,दि. 11 (जिमाका):  शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी माहिती संच व त्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहेत. या योजनेत शेतकऱ्यांना लागवडीखालील पोटखराब क्षेत्र समाविष्ठ करता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना संपर्क साधून सातबारा वरील पोटखराब वर्ग अ क्षेत्र हे लागवडीखालील क्षेत्रात रूपांतरित करण्यासाठी विहित प्रक्रिया पार पाडून लागवडी खालील क्षेत्र वाढवण्यात येईल तरी आपण मोठ्या संख्येने फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

ॲग्रिस्टॅकमधील फार्मर आयडी हा लागवडी योग्य क्षेत्राकरिता बनविण्यात येत असल्याने ज्या शेतकऱ्यांनी पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणले परंतू साताबारावर नोंद नाही अशा प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत विहित प्रक्रिया पार पाडून ई-फेरफार प्रणालीव्दारे पोटखराब वर्ग अ क्षेत्र सातबारावर लागवडीखालील क्षेत्रात रूपांतर केले जाईल. या रूपातंरित क्षेत्रामुळे ॲग्रिस्टॅकमधील फार्मर आयडीमध्ये दर्शविलेल्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये आपोआप वाढ होईल. तसेच भविष्यात होणारे जमीन हस्तांतरणाचे व्यवहार देखील  फार्मर आयडीशी आपोआप लिंक होणार आहेत. सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी बनवत असतांना आपले कोणत्याही प्रकारे सातबारावरील क्षेत्र कमी दाखविले जाणार नाही याची दक्षता घेवून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर आयडी जवळच्या जन सेवा केंद्र (सीएससी) येथे जावून तयार करून घ्यावा.

 

अद्ययावतीकरण चालू राहणार

ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीमध्ये पोटखराब खालील लागवडीची जमीन अथवा 7/12 मधील अन्य बदल दर्शविण्याची प्रक्रिया व अद्ययावतीकरण निरंतरपणे चालू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत जवळच्या जन सेवा केंद्र (सीएससी) येथे जावून फार्मर आयडी तयार करून घ्यावा.

 

योजनांच्या लाभ वितरणात येणार सुलभता

सदर ॲग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषि व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) तयार करण्यात येत असून उपलब्ध आकडेवारीच्या आधारे शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये सुलभता येणार आहे. तसेच लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरण अर्थात ई-केवायसीची आवश्यकता  राहणार नाही.

 

फार्मर आयडी नाही तर लाभ मिळणार नाही

ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपला सातबारा आधारला लिंक करुन फार्मर आयडी तयार करुन घ्यायचा आहे. फार्मर आयडी बनवला नाही तर पीक विमा, पीक कर्ज. पीएम किसान व विविध पीक अनुदान यांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तात्काळ न चुकता कोणाचीही वाट न पाहता विनाविलंब शेतकऱ्यांनी आधार आयडी क्रमांक ॲग्रिस्टॅक प्रणालीवर नोंद करावी.

 

नोंदणी करा

ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी नोंदणीकरिता शेतकऱ्यांनी जवळच्या जन सेवा केंद्र (सीएससी) अथवा तलाठी, मंडळ अधिकारी अथवा तहसिलदार यांना संर्पक करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

०००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या