एकत्रित आयुष्यमान भारत योजना : पाच लाखरुपयांपर्यंत मिळते मोफतउपचार आयुष्यमान कार्डसाठी आधार ई-केवायसी बंधनकारक ; Ø आजच नोंदणी करण्याचे आवाहन

 

वृत्त क्रमांक : 144

एकत्रित आयुष्यमान भारत योजना :

पाच लाखरुपयांपर्यंत मिळते मोफतउपचार

आयुष्यमान कार्डसाठी आधार ई-केवायसी बंधनकारक ;

Ø  आजच नोंदणी करण्याचे आवाहन

                                                               

बुलडाणा, (जिमाका) दि.4: राज्यात एकत्रित आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंर्तगत 1356 गंभीर आजारावर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येते. यासाठी लाभार्थी यांना प्रति वर्षाला 5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध  केली जात आहे.

या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात 23.52 लाख वैयक्त‍िक लाभार्थी असून 5.86 लाख लाभार्थी  कुटुंब आहेत. त्यापैकी 7.33 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण होऊन त्यांचे को ब्रॅंडेड कार्ड तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी 5.09 लाख लाभार्थ्याना आयुष्यमान को ब्रॅंडेड कार्ड वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित 16.19 लाख लाभार्थ्यांची आधार ई-केवायसी करण्याची  प्रक्रिया सुरु आहे. आयुष्यमान भारत योजनेअंर्तगत पात्र लाभार्थ्यांनी आधार ई-केवायसी करणे बंधनकारक असून नोंदणी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधार ई-केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

योजनेची वैशिष्ट्ये:

या योजनेअंर्तगत उपचार खर्च मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत असून प्रत्येक कुटुंबासाठी दरवर्षी मोफत उपचार दिले जात आहेत. तसेच किडनी प्रत्यारोपणासाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष 4.50 लाख रुपये दिले जात आहेत.

लाभार्थी पात्रता :-

Ø  महाराष्ट्र शासनाचे सर्व वैध शिधापत्रिकाधारक व अधिवास प्रमाणपत्रधारक असावा.

आवश्यक कागदपत्रे :-

Ø  महाराष्ट्रामध्ये योजनेचे लाभ घेण्याकरिता शिधापत्रिकेची मूळ सत्यप्रत अथवा अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) मूळ सत्यप्रत आवश्यक आहे

Ø  यासह लाभार्थ्याचे आधार कार्डची मूळ सत्यप्रत व त्याला आधारसंलग्न मोबाईल नंबर व लाभार्थी स्वतः असणे आवश्यक आहे.

52 रुग्णालयात मोफत उपचार :-

बुलढाणा जिल्हयातील 20 शासकीय रुग्णालय आणि 32 खाजगी रुग्णालयांमध्ये ही योजना लागु असून गरजु रुग्णांना आयुष्यमान भारत योजनेअंर्तगत मोफत उपचार घेता येणार आहे.

रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधा :-

एकत्रित योजनेतून रुग्णालयात मोफत सुविधा दिली जाते. त्यामध्ये १. रुग्णालयातील खाटा, २. निशुल्क निदान सेवा, ३. भुलसेवा व शस्त्रक्रिया, ४. आवश्यक औषध उपचार,५. शुश्रुषा व भोजन, ६. एक वेळचा परतीचा प्रवास या सुविधांचा समावेश आहे.

लाभार्थी यांनी ई-केवायसी कुठे करावी ?

पात्र लाभार्थी यांनी आशासेविका, स्वस्त धान्य दुकानदार, नागरी सुविधा केंद्र (CSC), आरोग्य कर्मचारी, आरोग्य मित्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र, शासकीय, निम शासकीय, तसेच खाजगी रुग्णालयांत फक्त आधार ई-केवायसी करावी लागणार आहे. आयुष्यमान भारत योजनेअंर्तगत आधार ई-केवायसी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करुन घ्यावी.

ई-केवायसीसाठी ई-सुविधा :-

एकत्रित आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअर्तगत ई -केवायसी करण्याकरीता लाभार्थ्यासाठी ई-सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

संकेतस्थळ :-

https://www.jeevandayee.gov.in/MJPJAY/FrontServlet

आयुष्मान ॲप :-

 https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp

नागरी सुविधा केंद्र (सीएससी) केंद्र :-

https://buldhana.nic.in/ई-सेवा-केन्द्र/

मदतीसाठी संपर्क :-

लाभार्थ्याना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व मदतीसाठी शासनाने उपलब्ध केलेल्या १४५५५/१८००१११५६५ ,१५५३८८/१८००२३३२२०० या  टोल फ्री नंबर, सेवा क्रमांकावर संपर्क करावा.

बुलढाणा जिल्ह्यातील अंगिकृत रुग्णालय:-

शासकीय रुग्णालयांचे नाव

1.      जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा, 2. सामान्य रुग्णालय, खामगाव, 3. ग्रामीण रुग्णालय. हिवरा आश्रम, 4. ग्रामीण रुग्णालय, बिबी, 5. ग्रामीण रुग्णालय. चिखली, 6. ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा युनिट, देऊळगाव राजा, 7. ग्रामीण रुग्णालय धाड 8. ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद, 9. ग्रामीण रुग्णालय,लाखनवाडा, 10. ग्रामीण रुग्णालय,लोणार, 11.ग्रामीण रुग्णालय,मेहकर, 12. ग्रामीण रुग्णालय, मोताळा, 13. ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा,14. उपजिल्हा रुग्णालय,मलकापूर, 15. उपजिल्हा रुग्णालय शेगांव, 16. ग्रामीण रुग्णालय वरवंट बकाल, 17. जिल्हा स्त्री रुग्णालय, बुलडाणा, 18. टी.बी. रुग्णालय, बुलडाणा, 19. ग्रामीण रुग्णालय,संग्रामपूर, 20 ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव माही.

 

खाजगी  रुग्णालयांचे नाव

1.अमृत हृदयालय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बुलढाणा, 2.बुलढाणा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बुलढाणा,3. संचेती हृदयालय बुलढाणा 4. शतायुषी कॅन्सर हॉस्पिटल बुलढाणा 5. सिटी हॉस्पिटल बुलढाणा 6. मेहेत्रे हॉस्पिटल बुलढाणा 7. अरिहंत डायलिसिस सेंटर बुलढाणा 8. श्री सिद्धिविनायक बाल रुग्णालय आणि डायबिटीस सेंटर बुलढाणा. 9. गुर्जर बाल रुग्णालय बुलढाणा 10. कोठारी हॉस्पिटल चिखली 11. तुळजाई हॉस्पिटल चिखली 12. सिद्धी कृपा हॉस्पिटल चिखली 13. श्री कृपा जवंजाळ हॉस्पिटल चिखली 14. धनवे हॉस्पिटल चिखली 15. मातोश्री हॉस्पिटल मेहकर 16. गाभणे हॉस्पिटल मेहकर 17. राठोड हॉस्पिटल मेहकर 18. पळसकर हॉस्पिटल मेहकर 19. साई बाल रुग्णालय खामगाव 20. सोनटक्के बाल रुग्णालय खामगाव 21. क्रिटी केअर हॉस्पिटल खामगाव 22. माऊली डायलिसिस सेंटर शेगाव 23. आस्था हॉस्पिटल मलकापूर 24. माणूस हॉस्पिटल मलकापूर 25. चोपडे हॉस्पिटल मलकापूर 26. कोलते हॉस्पिटल मलकापूर 27. हकीमी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मलकापूर 28. आयुष्मान हॉस्पिटल मलकापूर 29. अग्रवाल हॉस्पिटल नांदुरा 30. मोहता हॉस्पिटल नांदुरा 31. श्री राम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुलतानपूर (तूर्तास प्रक्रियेत) 32. सोनुने हार्ट केअर सेंटर आणि बाल रुग्णालय बुलढाणा  

                                                   0000000

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या