मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळाला उपाध्यक्ष अ.जावेद यांची भेट; विविध विषयाचा घेतला आढावा

 

मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळाला उपाध्यक्ष अ.जावेद यांची भेट;

विविध विषयाचा घेतला आढावा

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 28:  येथील मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मुंबईचे उपाध्यक्ष अ.जावेद व संचालक अहमद शरीफ देशमुख यांनी नुकतीच जिल्हा कार्यालयाला सदिच्छ भेट देवून महामंडळकडुन राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज, शैक्षणिक कर्ज योजनेचा आढावा घेतला. तसेच प्रलंबीत प्रस्ताव संदर्भात चर्चा करण्यात आली. गरजु लाभार्थ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे तसेच त्यांना कर्ज घेताना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांनी प्रामाणीक भावना दाखवत कर्जाची परतफेड करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यानंतर जिल्हा कार्यालयातील दैनंदीन समस्या या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. जिल्हा व्यवस्थापक ज्योती हिवाळे यांनी उपाध्यक्ष अ. जावेद यांना शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले.

0000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या