बुधवारी ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा

 

बुधवारी ‘जय शिवाजी, जय भारत पदयात्रा

             

बुलढाणा,दि. 14 (जिमाका):  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता ‘जय शिवाजी, जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेला शहरातील सर्व शैक्षणिक संस्थेमधील शिक्षक, क्रीडा प्रेमी तसेच विविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, शिवप्रेमी, प्रतिष्ठीत नागरिक, अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.

 

जिल्हा प्रशासन, नगरपरिषद, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरु यवा केंद्र व एन.सी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने जय शिवाजी, जय भारत पदयात्रेचे आयेाजन करण्यात आले आहे. या पदयात्रेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार असून उद्घाटनानंतर मान्यवराचे संबोधन होऊन पदयात्रेला प्रारंभ होईल.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या