जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कंत्राटी पध्दतीने भरती

 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कंत्राटी पध्दतीने भरती

बुलढाणा,(जिमाका), दि.17 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय बुलढाणा येथे माजी सैनिक, इतर प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर कंत्राटी पध्दतीने सैनिकी मल्टी टास्कींग स्टाफ (अशासकीय) 1 पद मेस्को व्दारे भरावयाचे आहे. सदर पदाकरीता इच्छुक सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या व इतर नागरीकांनी 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन‍ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. 

अर्जदाराने वैयक्तिक अर्जासोबत आधार कार्ड, पॉन कार्ड, बॅक पासबुक, 10 वी पास प्रमाणपत्र व संगणक प्रशिक्षण (MSCIT), टायपींग मराठी 30 व इंग्रजी 40 चे प्रमाणपत्र छायांकित प्रतीसह अर्जासोबत जोडावे. अर्जदार माजी सैनिक असल्यास पीपीओ, डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, संगणक प्रशिक्षण, टायपींग छायांकित प्रत अर्जासोबत सादर करावे.

00000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या