सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार; 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

 

सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार; 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

       बुलडाणा, (जिमाका) दि.5: सामाजिक न्याय विभागामार्फत समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व स्वंयसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी पुरस्कार देवुन गौरविण्यात येतात. त्याअनुषंगाने इच्छुक व पात्रताधारक व्यक्ती व संस्थानी दि. 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त भाऊराव रामसिंग चव्हाण यांनी केले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडक समाजभुषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पदमश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू,फुले,आंबेडकर पारितोषिक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मानपुर्वक गौरविण्यात येतो. याबाबत शासनाने सन 2023-24 वर्षासाठी दि.01 फेब्रुवारी रोजी जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने पात्र व्यक्ती, संस्था यांनी सहा पुरस्कारांचे अर्ज प्राप्त चेकलिस्टनुसार प्रस्ताव तयार करुन तीन प्रतीमध्ये सहायक आयुक्त, समाज कल्याण, बुलडाणा यांचे कार्यालयात विहित मुदतीत सादर करावेत. सदर अर्ज शासनाचे संकेतस्थळ https //sjsa.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहेत. तसेच पात्रतेचे निकष, अटी, शर्ती संदर्भातील माहिती सहायक आयुक्त,समाज कल्याण कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या