डाक जीवन विमा योजनेचे प्रीमिअम भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा
डाक जीवन विमा योजनेचे प्रीमिअम भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा
बुलढाणा,
दि. 24 (जिमाका): भारतीय डाक विभागामार्फत डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा
या योजना नागरिकांना विमासुरक्षा देण्याकरिता चालविल्या जातात. विमा योजनांचे प्रीमिअम
भरण्यासाठी विमाधारकांनी ऑनलाईन पध्दतीचा वापर करण्याचे आवाहन डाक अधीक्षक गणेश आंभोरे
यांनी केले आहे.
विमाधारकांनी
विमा योजनांचे प्रीमिअम भरण्यासाठी pli.indiapost.gov.in या लिंकचा किंवा आयपीपीबी
ॲपचा उपयोग करावा. याशिवाय एनएसीएच सुविधेचा उपयोग करुन विमाधारकांच्या बँक खात्यामधून
आपोआप कपातीची सुविधा वापरावी. तसेच ज्या विमाधारकांच्या पॅालिसीला मोबाईल क्रमांक
व ईमेल आयडी अद्ययावत नाही अशांनी इंडिया पोस्ट कॅाल सेंटरच्या 1800 266 6868 या क्रमांकावर
किंवा आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन डाक अधीक्षक यांनी
केले आहे.
000000
Comments
Post a Comment