‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेअंर्तगत फुटबॉल स्पर्धा

 

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेअंर्तगत फुटबॉल स्पर्धा

बुलडाणा, (जिमाका) दि.3:  शासनाच्या “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या योजनेला नुकतेच 10 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या द्वारे जिल्हा फुटबॉल अकॅडमी व सेंट जोसेफ शाळेच्या मुलींच्या संघाचा जिल्हास्तर फुटबॉल खेळाचा सामना उत्साहात रंगला. या सामन्याचे आयोजन दि.29 जानेवारी रोजी शारदा ज्ञानपीठ बुलढाणा येथे करण्यात आले होते.

या सामन्यामधून मुलींमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, शारीरीक दृष्ट्या सक्षम व्हावे हा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच फुटबॉल या खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आला. 

या सामन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस.महानकर, जिल्हा फुटबॉल संघटनेचे सरचिटणीस.एन.आर. वानखेडे , अध्यक्ष एस.एस. ठाकरे, महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ जीवन मोहोड, क्रीडा अधिकारी.आर. धारपवार , एस.केळे,श मुकेश बाफणा,  जोशी व  कार्यालयाचे सर्व कर्मचारी, दोन्ही संघाचे मार्गदर्शक दिपीक्षा हिवाळे  व‍ दिलीप हिवाळे यांच्या उपस्थितीत या सामन्याचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये विजयी संघाला व उपविजयी संघाला प्रमुख अतिथी अध्यक्ष प्र.देशपांडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सामान्याच्या आयोजनासाठी रमीज, मनोज श्रीनीवास, निसार,अतिक,शहबाज,राणा, इत्यादींनी स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन केले.  00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या