डाक जीवन विमा पुनर्जीवित करण्यासाठी विशेष मोहिम
डाक जीवन विमा पुनर्जीवित करण्यासाठी विशेष मोहिम
बुलढाणा,दि. 12 (जिमाका):
भारतीय डाक विभागामार्फत डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा योजना नागरिकांना विमा
सुरक्षासाठी सुरु करण्यात आली आहे. परंतु काही विमाधारकांच्या विमा पॉलीसी नियमित हफ्ता
न भरल्यामुळे बंद पडलेल्या आहेत. सदर बंद पडलेल्या विमा पॉलीसी पुनर्जीवित करण्याकरिता
डाक संचालनालय, पोस्टल जीवन विमा, नवी दिल्ली यांचे आदेशानुसार दि. 1 मार्च ते 31 मे
2025 या कालावधीमध्ये विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कालावधी दरम्यान
पुनर्जीवित करण्यात येणाऱ्या विमा पॉलीसीचे दंडावर काही प्रमाणात सूट देण्यात येणार
आहे. या संधीचा नागरिकांनी लाभ घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस येथे संपर्क साधावा,
असे आवाहन डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे. 000000
Comments
Post a Comment