उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका पाठविण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ अधिकाधिक पत्रकारांनी सहभागी होण्याचे आवाहन

 


उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका पाठविण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

अधिकाधिक पत्रकारांनी सहभागी होण्याचे आवाहन

बुलढाणा , दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी, 2025 अशी होती. परंतू, विविध स्तरावरुन मुदतवाढ देण्याची मागणी होत असल्यामुळे विभागामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका स्विकारण्यासाठी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.  राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - 32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावेत.

अर्जाचेनमुने  dgipr.maharashtra.gov.in    www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पुरस्काराचे स्वरुप याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

पुरस्कारांची माहिती

 

अ.क्र     पुरस्काराचे नाव  पारितोषिक

1.         अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)      1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)

2.         बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)  51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

3.         अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)   51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

4.        बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)           51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

5.         मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)     51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

6.         यशवंतराव चव्हाण पुरस्कार

शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)    51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

7.        पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर)       51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

8.         तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)          51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

9.         केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)     51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

10.       समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)          51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

11.       स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)     51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

12.       पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

 

 विभागीय पुरस्कार

13.       दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)

            51 हजार रुपये  (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,  या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

14.      अनंतराव भालेराव पुरस्कार, (औरंगाबाद आणि लातूर विभाग)       51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

15.       आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)        51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

16.       नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग)         51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

17.      शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग)   51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

18.       ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग)  51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

19.       लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)       51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

20.       ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग)       51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

0000000

 

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या