मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक पदाची भरती

 

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक पदाची भरती

 

        बुलढाणा दि. 11 (जिमाका) : सेवागिरी बाबा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोताळा येथे ठोक मानधनावर निदेशक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक अर्हताधारक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मुळ प्रतिसह स्वखर्चाने दि. 17 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहावे, असे आवाहन सेवागिरी बाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य एस.डी.गगावणे यांनी केले आहे.

 

            आयएमसी अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी निव्वळ तात्पुरत्या मानधानावर 14 हजार रुपये प्रतिमाह प्रमाणे नव्याने संलग्नता प्राप्त झालेल्या व्यवसायाच्या रिक्त असलेले निदेशक पदे भरावयाची आहेत. इच्छुक अर्हताधारक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मुळ प्रतिसह स्वखर्चाने दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी सेवागिरी बाबा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोताळा मलकापुर रोड, जि. बुलढाणा येथे उपस्थित राहावे. सबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी, पदविका, आयटीआय पास व अनुभव असल्यास प्राधान्य राहील. पदासंदर्भातील अटीशर्ती व सविस्तर माहिती https://dgt.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी