DIO BULDANA NEWS 28.09.2023
पाण्याच्या उपलब्धतेसाठी वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन बुलडाणा, दि. 28 : पावसाळा संपल्यानंतरही पाण्याचा प्रवाह नाले आणि ओढ्यातून सुरू राहतो. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेसाठी श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे. अल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याच्या सूचना कृषी संचालक आणि जिल्हाधिकारी यांनी केल्या आहे. सन 2023-24 मध्ये जून ते सप्टेंबर पावसाळी हंगाम संपल्यानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत नाले आणि ओढ्यांमधून पाण्याचा प्रवाह सुरू राहतो. हा पाण्याचा प्रभाव पारंपारिक पद्धतीने अडवून पाण्याचा साठा करण्यात येतो. यामधील वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित सिंचन देणे, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी वनराई बंधारे लोक सहभागातून घेण्यात येणार आहे. कृषी विभागांतर्गत दरवर्षी वनराई बंधारे बांधण्याचे काम केले जाते. वनराई बंधारे बांधल्यास संरक्षित सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होते. तसेच पाणीसाठा निर्माण क्षमता वाढते. रब्बी पीक घेण्यास शेतकऱ्यांना मदत होते. यावर्षी प्रत्येक कृषी सहाय्यकांना 10 वनराई बंधारे श्रमदानातून...