DIO BULDANA NEWS 25.05.2024



 पुन्हा 700 ब्रास वाळू जप्त

*मेहकर, लोणार येथे 14 टिप्परवर कारवाई
बुलडाणा, दि. २५ : जिल्ह्यातील अवैध वाळू विरोधात कारवाई सुरूच आहे. यात संग्रामपूर आणि सिंदखेडराजा तालुक्यात कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत 700 ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली असून मेहकर, लोणार येथे 14 टिप्पर वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
काल सायंकाळी उशिरा नारायणखेड येथील अवैध साठा करण्यात आलेली 400 ब्रास वाळू आढळून आली. महसूल विभागाने ही वाळू जप्त करून कारवाई केली. तसेच खिरोडा, ता. संग्रामपूर येथे 300 ब्रास वाळूचा साठा निदर्शनास आला. या ठिकाणीही सदर वाळू जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी, दि. 24 मे रोजी विशेष मोहिमेदरम्यान मेहकर व लोणार तालुक्यामध्ये विना नंबर प्लेट 14 टिप्पर वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात सुमारे 1 लाख 33 हजार 500 रुपये एकूण दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. परिवहन विभागाचे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक रितेश चौधरी, सुरेखा सपकाळ, अनुजा काळमेघ यांनी ही कारवाई केली.
आज चांगेफळ, ता. संग्रामपूर गावानजीक अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला. पंचनामा करुन सदर ट्रॅक्टर तामगाव पोलीस स्टेशन येथे देण्यात आला आहे.
गावांमध्ये अवैध वाळूचा साठा करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांमधील कारवाईदरम्यान याबाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांनी तलाठी, मंडळ अधिकारी त्यांच्या सहकार्याने गावांमध्ये करण्यात येणाऱ्या अवैध वाळूसाठाची माहिती घेऊन कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या