DIO BULDANA NEWS 07.05.2024
खरीप हंगामासाठी 1.77 लाख मेट्रीक टन खत आवंटन मंजूर
बुलडाणा, दि. 7 : खरीप
हंगामाच्या नियोजनाला सुरवात करण्यात आली आहे. त्यानुसार कृषि आयुक्तालयाकडून
जिल्ह्याला खरीप हंगाम 2024-25 करीता 1 लाख 77 हजार 900 मेट्रीक टन रासायनिक खताचे
आवंटन मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात खताचा पुरवठा
होणार आहे.
जिल्ह्यात मे 2024 अखेर 10 हजार
290 मेट्रीक टन खताचा साठा आवश्यक असून आतापर्यंत 1 लाख 5 हजार 455 मेट्रीक टन
रासायनिक खत साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात आज रोजी खत विक्रेत्यांकडे
20.20.0.13 चा 35 हजार 943 मेट्रीक टन, 10.26.26 चा 10 हजार 505 मेट्रीक टन,
15.15.15 चा 3 हजार 572 मेट्रीक टन, 16.16.16 चा 1 हजार 993 मेट्रीक टन, 24.24.0
चा 2 हजार 64 मेट्रीक टन, 14.35.14 चा 3 हजार 873 मेट्रीक टन, युरीयाचा 18 हजार
653 मेट्रीक टन, डीएपी 5 हजार 109 मेट्रीक टन, एमओपी 1 हजार 182 मेट्रीक टन,
एसएसपी 19 हजार 475 मेट्रीक टन, इतर खते 3 हजार 86 मेट्रीक टन खत साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना कृषि केंद्रामध्ये उपलब्ध
खताची माहिती adozpbuldana.blogspot.com/2022/04/blog-post.html या ब्लॉगस्पॉटवर उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांनी एकाच खताची मागणी करू नये. माती
परिक्षणानुसार वेगवेगळ्या खताचा संतुलित वापर करावा, जेणेकरून जमिनीची सुपिकता
टिकून राहून उत्पादनात वाढ होईल. शेतकऱ्यांनी रासायनिक खताची खरेदी अधिकृत
परवानाधारकाकडून करावी, तसेच खरेदी केलेल्या रासायनिक खताचे पक्के देयक घ्यावे.
डीएपी या खताला पर्यायी खते म्हणून 10.26.26, 12.32.16, 24.24.0 एसएसपी, 15.15.15,
20.20.0, 20.20.013, 14.35.14, युरीया आणि डीएपी या रासायनिक खताचा वापर करून,
जमीन आरोग्यानुसार शिफारस केलेल्या खताचा समतोल वापर करावा.
तसेच नॅनो युरीया व नॅनो डीएपी इफ्को, व आरसीएफ या
उत्पादक कंपनीची खते उपलब्ध असून खताचा वापर फवारणीद्वारे करण्यात यावा.
शेतकऱ्यांनी रासायनिक खते, बियाणे, किटकनाशकेबाबत तक्रारीसाठी तालुकास्तरावर
तालुका कृषि अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.
00000
मलकापूर मतदारसंघात मतदानासाठी
प्रतिबंधात्मक आदेश लागू
बुलडाणा, दि. 7 :
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश रावेर लोकसभा मतदारसंघात
असल्याने या मतदारसंघाच्या मतदानासाठी मलकापूर मतदारसंघात प्रतिबंधात्मक आदेश लागू
करण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 ची
घोषणा केली आहे. त्यानुसार दि. 16 मार्च ते 6 जून 2024 पर्यंत राज्यात आदर्श आचार
संहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहणे
आवश्यक असल्याने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय व निपक्षपातीपणे पार
पाडण्याच्या दृष्टीने राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांनी मतदानाचा निश्चित केलेल्या
दिनांकाच्या 48 तासाच्या अगोदर सदर मतदारसंघ सोडून जाणे आवश्यक आहे. तसेच अशा
व्यक्तींनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय सभा घेऊ नये.
त्यानुसार मुंबई पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)
नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व
सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक असल्याने, दि. 13 मे 2024 रोजी रावेर लोकसभा
मतदारसंघातील मलकापूर विधानसभा मतदारसंघात मतदान होणार असल्याने कायदा व
सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टीने तसेच लोकसभा निवडणूक निर्भय व निपक्षपातीपणे
पार पाडण्याच्या दृष्टीने मतदानाचा दिनांक व मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर
म्हणजे दि. 11 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेनंतर कोणत्याही प्रकारच्या राजकीय सभा
घेऊ नये, असे आदेश दिले आहे.
तसेच राजकीय नेते, कार्यकर्ते सदर मतदारसंघाचे मतदार
नसतील अशा व्यक्तींनी मतदानाच्या निश्चित केलेल्या दिनांकाच्या 48 तासाच्या अगोदर
सदर मतदारसंघ सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदर बंदी आदेश मलकापूर
विधानसभा मतदारसंघात दि. 11 मे 2024 रोजीचे सकाळी 6 वाजल्यापासून ते दि. 13 मे
2024 चे रात्री 22 वाजेपर्यंत लागू राहील. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती
मुंबई पोलिस अधिनिमय, 1951 चे कलम 135 व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार
कार्यवाहीस पात्र राहणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी
डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment