DIO BULDANA NEWS 20.05.2024
नांदुरा, मोताळा, मलकापूर, लोणार
वसतीगृहातील प्रवेश प्रक्रियेस सुरवात
बुलडाणा, दि. 20 : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अधिनस्त वसतीगृह मागास व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह नांदुरा, लोणार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह मोताळा आणि मलकापूर येथील वसतीगृहातील शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
मागासवर्गीयप्रवर्ग निहाय आरक्षित टक्केवारीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, जमाती, आर्थिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागासप्रवर्ग, दिव्यांग, अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशास पात्र राहणार आहेत. शालेय, कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयीन, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता नगरपालिकेच्या हद्दीतील शाळा, विद्यालय, महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रथम व द्वितीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र आहेत. प्रवेश अर्ज करण्याची अंतिम दि. 25 मे 2024 असून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची पहिली यादी दि. 31 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरावेत. असे आवाहन मोताळा वसतीगृहाचे गृहपाल ए. एस. इंगळे, भ्रमणध्वनी क्रमांक 9423761403, नांदुरा वसतिगृहाचे गृहपाल एस. व्ही. सोनटक्के, भ्रमणध्वनी क्रमांक 8975778949, मलकापूर वसतीगृहाचे गृहपाल ए. एस. इंगळे, भ्रमणध्वनी क्रमांक 9423761403. आधिक माहिती करिता भ्रमनध्वनीवर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष वसतीगृहाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
पाणीटंचाई निवारण्यासाठी विंधन विहिरींना मंजुरी
बुलडाणा, दि. 20 : पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार 43 गावासाठी 61 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.
पाणीटंचाई निवारणार्थ खामगाव तालुक्यातील 4 गावात, चिखली तालुक्यातील 13 गावात आणि मेहकर तालुक्यातील 26 गावामध्ये 61 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. या गावामध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. खामगाव तालुक्यातील हिवरखेड, आवार, कारेगाव बु,, ज्ञानगंगापूर. चिखली तालुक्यातील देउळगाव धनगर, मंगरुळ (इ.), अंत्री खेडेकर, मेरा बु., गुंजाळा, एकलारा, डोंगरशेवली, हरणी, घानमोड, सोमठाणा, खंडाळा (म.), मेहकर तालुक्यातील वरदडा, लोण (ल.), गजरखेड, दुधा, सावत्रा, मारोती पेठ, माळेगाव, जानेफळ, वरवंड, वडगाव माळी, नेमतापूर, दादुलगव्हाण, गणपूर, मोळा, रत्नापूर (मो.), पारडी, घुटी, बोथा, पारखेड, मांडवा स., डोंगर, देउळगाव साकरशा, नायगाव देशमुख, वागदेव, नागेषवाडी, कराळवाडी, जनुना या गावात विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. यामुळे या गावामधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चित मदत मिळणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment