Tuesday 18 October 2022

DIO BULDANA NEWS 18.10.2022





 जिल्ह्यातील दोन स्टार्टअप्स संकल्पना राज्यस्तरावर सन्मानित

बुलडाणा, दि. 18 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले. यात जिल्हास्तरावरील परशराम आखरे आणि अक्षय डीडवानिया यांच्या स्टार्टअपची राज्यस्तरावर निवड झाली आहे. त्यांनी राज्यस्तरावरील कृषी क्षेत्रातून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यातील दोन स्टार्टअपची राज्यस्तरावर निवड झाल्यामुळे जिल्ह्यातील उद्योगक्षेत्रात यामुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नागरिकांच्या नवसंकल्पनांना मुर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा घेण्यात आली. यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांचे हस्ते दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आला. त्यानंतर स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रे अंतर्गतच्या दुसऱ्या टप्प्यातील जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी बुलडाणा येथील पंकज लद्धड इन्स्टिट्युट ऑॅफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट स्टडीज येथे पार पडली.

स्पर्धेत एकूण 37 उमेदवारांनी सादरीकरण केले. यात जिल्हास्तरावर परशराम आखरे, डॉ. विशाल पानसे आणि अक्षय डीडवानिया यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला. त्यानंतर राज्यस्तरावरील विजेत्यांना दि. 16 ऑक्टोबर 2022 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे राज्यस्तरीय कृषी क्षेत्रातील प्रथम परमशराम आखरे व द्वितीय अक्षय दिडवाडीया व टीम यांना सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा बुलडाणा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यात जिल्ह्यातील दोन स्टार्टअपची राज्यस्तरावर निवड झाली आहे. राज्यस्तरावर निवड झालेल्या उमेदवारांचे जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती आणि सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी कौतुक केले आहे.

00000

No comments:

Post a Comment